मनोरंजन वृत्त
'सिंघम रिटर्न्स' चार दिवसांत शंभर कोटींवर
मनोरंजन वृत्त
Tuesday, 26 August 2014 04:12

'सिंघम रिटर्न्स' चार दिवसांत शंभर कोटींवर

नवी दिल्ली- दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांच्या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस भरपूर गल्ला जमविला आहे. त्यांच्या ‘सिंघम रिटर्न्स‘ने प्रदर्शनानंतर चार दिवसांत शंभर कोटी रुपये कमावले आहेत.

Read more...
 
'राम लखन'चा रिमेक!
मनोरंजन वृत्त
Friday, 22 August 2014 06:10

'राम लखन'चा रिमेक!

जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या भूमिका असलेल्या 'राम लखन' (१९८९) चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. सुभाष घईंच्या या चित्रपटात डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी, अमरिश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
करण जोहरने नुकतचं ट्विट केलं असून या चित्रपटाकरिता रोहित शेट्टी, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि मुक्ता आर्टस् हे त्रिकुट एकत्र येणार आहे.

Read more...
 
बच्चन असल्याने ऐशने लग्न केले नाही
मनोरंजन वृत्त
Tuesday, 18 February 2014 18:16

बच्चन असल्याने ऐशने लग्न केले नाही

 - - पीटीआय

मुंबई- मी अभिनेता आहे किंवा अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे म्हणून ऐश्‍वर्याने माझ्याशी लग्न केलेले नाही, किंवा ती जगातील सर्वांत सुंदर स्त्री आहे म्हणून मी तिच्याशी लग्न केलेले नाही, असे स्पष्टीकरण अभिषेक बच्चन याने दिले. 

 

"कॉफी वुइथ करण'शोमध्ये अभिषेकने करण जोहरला मुलाखत दिली. 

जगातील सर्वांत सुंदर स्त्रीशी लग्न केल्यामुळे वैवाहिक जीवन थोडे असुरक्षित झाले आहे का? असा प्रश्‍न करणने विचारला होता, त्याला अभिषेकने उत्तर दिले. आम्ही एकमेकांना कोणत्याही नकलुपी चष्म्यातून बघत नसल्याचेही अभिषेकने सांगितले. ऐश्‍वर्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात, असेही त्याने या वेळी सांगितले. 

 
संगीत नाट्याच्या "शिलेदार" हरपल्या.
मनोरंजन वृत्त
Thursday, 08 August 2013 07:31

संगीत नाट्याच्या "शिलेदार" हरपल्या.

jaymala shiledarजयेष्ठ रंगकर्मी, पद्मश्री व संगीत नाट्यक्षेत्रातील महत्वाचे व्यक्तीमत्व जयमाला शिलेदार यांचे आज पहाटे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालविली.
संगीत नाटकांचे प्रचार आणि प्रसार करणा-या जयमाला शिलेदार यांनी सलग पन्नास वर्षे संगीत नाटकप्रेमींसाठी संगीत नाटके रंगमंचावर सादर केली. मराठी नाट्यसृष्टीतील गायक व अभिनेते तसेच आपले पती जयराम शिलेदार यांच्याबरोबर अनेक संगीत नाटकात काम केले. १९४२ पासून मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, संगीत शारदा हि त्यांची गाजलेली नाटके.
१९२६ साली जन्म झालेल्या या गायकीने बेळगावमध्ये दोन वर्ष गायकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील गाण्याचे शिक्षण त्यांनी जयपूर घराण्याच्या मोगुबाईकडे घेतले. बालगंधर्व यांच्याबरोबर कलाकार म्हणून काम केलेल्या यांची ओळख असणा-या संगीत नाटिकेला ३ वेळा बालगंधर्व, २००६ मध्ये लता मंगेशकर तर हल्ली पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अशा अजरामर संगीत नाट्यातील गायकेला मुंबई-पुणे ऑनलाईन.काम तर्फे भावपूर्ण आदरांजली......

 
स्मरण नाट्यवीराचे....
मनोरंजन वृत्त
Saturday, 27 July 2013 17:28

स्मरण नाट्यवीराचे....

प्रसाद शिंदे(प्रतिनिधी), मुंबई :-
108 7921मराठी रंगभूमीतील नाट्य क्षेत्रात मानाने नाव घेतले जाते ते म्हणजे “मास्टर दत्ताराम वळवईकर” यांचे. नुकतेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “आठवणीतील मा.दत्ताराम” परिसंवाद आणि प्रदर्शन हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभाग व संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात मास्टर दत्ताराम यांनी साकारलेल्या नाटकातील भूमिकांचे चित्रे व त्यांच्यावर आधारित रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते रविंद्र नाट्यमंदिर येथे झाले. कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी, डॉ.भालेराव, मोहनदास सुखटणकर, श्रीमती फैय्याज व आशालता, अरुण घाडीगांवकर, कमलाकर गोंजी, शशी भालेकर, कृष्णा बोरकर, आशुतोष घोरपडे, मा.दत्ताराम यांचे पुत्र नाना वळवईकर इत्यादी दिग्गज उपस्थित होते.
108 7928अशा या नाट्यवीराने १०० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय करत अडीचशेहून अधिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच २०० नाटके त्यांच्या तोंड पाठ होती. त्यांनी इंद्रजितवध, कीचकवध, मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, रायगडाला जेव्हा जाग येते, सौभद्र, पंतांची सून, होनाजी बाळा इत्यादी अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. वरील कार्यक्रमात मा.दत्ताराम यांनी साकारलेल्या नाटकातील भीष्म, राम, संभाजी, मोरोपंत अशा अनेक
भूमिका संस्कार भारती कलामांचाच्या कलाकारांनी रांगोळ्यांच्या वा चित्र प्रदर्शनाच्या मार्फत सादर करण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनात मा.दत्ताराम यांचे गणेश अडवल यांनी साकारलेले शिल्प हि पाहण्यात येईल. हे प्रदर्शन रविंद्र नाट्यमंदिर येथील पु.ल.देशपांडे अकादमी येथे २८ जुलै पर्यंत सकाळी १० ते ८ वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहिलं.

 

 
विक्रम गोखले यांना जीवनगौरव
मनोरंजन वृत्त
Friday, 07 June 2013 05:11

विक्रम गोखले यांना जीवनगौरव

पीटीआय, पणजी

२८ जून रोजी येथे होणाऱ्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विक्रम गोखले यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla