इन्फोटेक - बातम्या
|
Thursday, 20 February 2014 05:34 |
"व्हॉट्स अप' होणार फेसबुकच्या मालकीचे
- - वृत्तसंस्था ,गुरुवार, 20 फेब्रुवारी 2014 न्यूयॉर्क - "व्हॉट्स अप' ही सध्या अत्यंत लोकप्रिय असलेली मोबाईल मेसेजिंग सेवा फेसबुक कंपनी विकत घेणार असून ही आत्तापर्यंतची फेसबुकची सर्वांत मोठी खरेदी असणार आहे. "व्हॉट्स अप' फेसबुक तब्बल 19 अब्ज डॉलर्सना विकत घेणार आहे.
याआधी विकत घेतलेल्या "इन्स्टाग्राम'प्रमाणेच "व्हॉट्स अप' हीदेखील स्वतंत्र सेवा ठेवण्याचा मनोदयने फेसबुकने व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम हे सॉफ्टवेअर फेसबुकने 715 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतले होते.
व्हॉट्स अप ही सेवा जगभरातील सुमारे 45 कोटींपेक्षा जास्त ग्राहक वापरतात. या तुलनेत ट्विटर ही सेवा सुमारे 24 कोटी ग्राहक वापरतात. व्हॉट्स अप लवकरच एक अब्ज ग्राहकांचा टप्पा पार करेल, असा आशावाद फेसबुकचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केला आहे. |