Property news of Mumbai and Pune in Marathi
गोरेगाव- मुलुंड रस्त्याचा मार्ग मोकळा
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 06:23

गोरेगाव- मुलुंड रस्त्याचा मार्ग मोकळा

आरे कॉलनीतील रस्ता पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर आता गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला गती मिळाली आहे. वनक्षेत्रातून जात असलेला हा रस्ता मंजुरीप्रक्रियेत अडकला होता, मात्र आता त्याच्या आराखडय़ात बदल करण्यात आले असून येत्या तीन महिन्यांत निविदा मागवण्यात येतील. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडनंतर पश्चिम व पूर्व उपनगरे जोडणाऱ्या योजनेतला हा तिसरा व शेवटचा रस्ता आहे.

Read more...
 
ठाण्यात टॉवर संस्कृतीला लगाम
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 06:07

ठाण्यात टॉवर संस्कृतीला लगाम

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बिल्डरांवर चार चटईक्षेत्राची खैरात करत ठाणे, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये आखलेली भाडेतत्त्वावरील घरांची योजना राज्य सरकारने गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे सुधारित धोरण आखण्यात आले असून विकासकांना यापुढे चारऐवजी तीन चटईक्षेत्र निर्देशांकानुसार ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसारख्या शहरांमध्ये 'परवडणारी घरे' उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ही परवानगी देताना दाटीवाटीचे क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे ठाण्यासारख्या शहरात अरुंद रस्त्यांना लागून गगनचुंबी इमारती उभारण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. आता ठाणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी सध्या छोटय़ा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची 'टॉवरस्वप्ने' संपुष्टात येणार आहेत.

Read more...
 
गृहनिर्माणासाठी सहा हजार कोटींची तरतूद
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Tuesday, 18 February 2014 18:11

गृहनिर्माणासाठी सहा हजार कोटींची तरतूद

- - सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - यंदाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पापासून आपल्याला फार अपेक्षा नव्हत्याच, असा सूर गृहनिर्माण क्षेत्रातून व्यक्‍त होत असला, तरी देखील अंतरिम अर्थसंकल्पात पी. चिदंबरम यांनी गृहनिर्माण क्षेत्राकरिता सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद प्रामुख्याने ग्रामीण भागातील गृहनिर्माण प्रकल्पांकरिता असली, तरी शहरी प्रकल्पांकरिता देखील दोन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. 

 

गेल्या काही वर्षांमध्ये गृहनिर्माण क्षेत्राला उतरती कळा लागलेली आहे. आर्थिक मंदीची पार्श्‍वभूमी आणि अशाश्‍वत नोकऱ्या यामुळे नागरिक गृहखरेदी करायला धजावत नाहीत. परिणामी गेल्या वर्षभरात या क्षेत्राला अत्यंत वाईट परिस्थितीतून जावे लागले आहे, त्यामुळे त्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पात काही ठोस पावले उचलणे अपेक्षित होते; मात्र पायाभूत सुविधांच्या विकासाकडेच अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे, तर गृहनिर्माण क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असे असले तरी देखील गेल्या वर्षात केंद्र सरकारने गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासाकरिता बरीच सकारात्मक पावले उचलली आहेत. 

 

गेल्या वर्षात बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याकरिता गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकरिता विधेयक देखील करण्यात आले आहे, त्यामुळे त्याचा बऱ्याच प्रमाणात सर्वसामान्य माणसाला फायदा होणार आहे. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पात मात्र या क्षेत्राकरिता विशेष तरतूद होणे अपेक्षित नव्हतेच, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. तरी देखील ग्रामीण भागातील गृहनिर्माण प्रकल्पांकरिता सहा हजार कोटी रुपयांची तरतूद अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली असून, त्याव्यतिरिक्त शहरी गृहनिर्माण प्रकल्पांकरिता आणखी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात शहरांसोबतच ग्रामीण भागाकडे देखील प्रामुख्याने लक्ष देण्यात आले आहे. 

 

""परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्राकरिता सरकारने उचललेली सकारात्मक पावले या क्षेत्रात कामाला चालना देणारी आहेत, त्यामुळे तीन ते चार मेट्रोपॉलिटीयन शहरांमधील बांधकाम प्रकल्पांना वेग येण्याची शक्‍यता आहे.'' 

अनुज पुरी, अध्यक्ष, जॉन्स लॅंग लासेल, इंडिया

 
म्हाडाच्या घरांचे दुर्दैवी राजकारण
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:23

म्हाडाच्या घरांचे दुर्दैवी राजकारण

Maharashtra Times
सुलक्षणा महाजन

राजकीय हस्तक्षेपातून मुक्त-स्वायत्त म्हाडा , जोडीला प्रभावी जमीन धोरण आणि व्यावसायिक प्रगल्भ नागरी नियोजन या तीन सूत्रांचे पालन केले , तर परवडणारी घरे सर्वांना देता येतील आणि मुंबई व महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्तही करता येईल. शिवाय गृहबांधणी क्षेत्रातील शिक्षण , अनुभव आणि व्यावसायिक शिस्तही आवश्यक आहेच.

Read more...
 
ग्राहकांसाठी 'कार्पेट एरिया'चे 'रेड कार्पेट'
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:20

ग्राहकांसाठी 'कार्पेट एरिया'चे 'रेड कार्पेट'

Maharashtra Times |6 June 2013

' बिल्टअप ,' ' सुपर बिल्टअप ' असे फंडे आता बांधकाम व्यवसायातून कागदोपत्री हद्दपार होणार असून भविष्यात फक्त ' कार्पेट एरिया ' चीच विक्री करता येणार आहे . केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच मान्य केलेल्या रियल इस्टेट नियमनाच्या मसुद्यामध्ये या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे .

Read more...
 
सहकारी सोसायट्यांच्या कामाकरिता पगारी मॅनेजर
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:18

सहकारी सोसायट्यांच्या कामाकरिता पगारी मॅनेजर


Maharashtra Times | June 6, 2013

समीर मणियार , मुंबई

सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पाण्याची बिले किंवा छोट्यामोठ्या कामांसाठी पदाधिकाऱ्यांनाच कामावर दांडी मारून खेटे घालावे लागतात. त्यामुळे साहजिकच , ' नको ते सोसायटीचे काम ', असे म्हणत अनेक सदस्य त्यासाठी हात वर करतात आणि मग काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांची सोसायटीच मक्तेदारी निर्माण होते. ही कोंडी फोडण्यासाठी सहकारी सोसायट्यांना दैनंदिन कामांसाठी पगारी मॅनेजर नियुक्त करण्याची मुभा सहकार कायद्यातील दुरुस्तीमुळे मिळाली आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla