Finance news of Mumbai and Pune in Marathi
‘ईपीएफओ’च्या व्याजदराचा निर्णय मंगळवारी
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:03

‘ईपीएफओ’च्या व्याजदराचा निर्णय मंगळवारी

नवी दिल्ली : देशभरातील कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फन्ड ऑर्गनायझेशन'तर्फे ('ईपीएफओ') चालू आर्थिक वर्षातील ठेवींवरील व्याजदराचा निर्णय मंगळवारी (२६ ऑगस्ट) घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Read more...
 
हातमाग उत्पादनांचे ‘फ्लिपकार्ट’वर मार्केटिंग
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:00

हातमाग उत्पादनांचे ‘फ्लिपकार्ट’वर मार्केटिंग

हातमागावर कापडाचे उत्पादन घेणाऱ्या विणकरांच्या उत्पादित मालाचे विपणन (मार्केटिंग) करण्यासाठी मोदी सरकारने ऑनलाइन रिटेल क्षेत्रातील आघाडीच्या 'फ्लिपकार्ट'ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि 'फ्लिपकार्ट'मध्ये सोमवारी सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

Read more...
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकपदी दोन स्वतंत्र व्यक्तींच्या नेमणुकांचा विचार
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 03:55

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकपदी दोन स्वतंत्र व्यक्तींच्या नेमणुकांचा विचार

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील व्यवहाराच्या निर्णयाचे सर्वाधिकार एकाच व्यक्तीकडे ठेवू पाहणारी व्यवस्था केंद्र सरकार बदलण्याच्या प्रयत्नात आहे. यानुसार या बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद वेगळे करून त्यावर दोन भिन्न व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या विचारात सरकार आहे.

Read more...
 
नॅचरल गॅस भाववाढीची मागणी
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 03:45

नॅचरल गॅस भाववाढीची मागणी

खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खननाच्या व्यवसायातील खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज, कैर्न इंडिया, 'बीपी' आणि सरकारी क्षेत्रातील ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ('ओएनजीसी') या कंपन्यांनी नैसर्गिक वायूची ४.२ अमेरिकन डॉलर दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स हा सध्या असलेला भाव वाढवावा अशी एकमुखी मागणी केंद्र सरकारकडे केली.

Read more...
 
दरमहा १३ नि:शुल्क एटीएम उलाढाली नोव्हेंबरनंतरही शक्य!
अर्थविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 06:14

दरमहा १३ नि:शुल्क एटीएम उलाढाली नोव्हेंबरनंतरही शक्य!

वाणिज्य बँकांची संघटना 'आयबीए'च्या प्रस्तावानुसार, रिझव्‍‌र्ह बँकेने मुंबईसह सहा बडय़ा महानगरांमध्ये एटीएममधील नि:शुल्क उलाढालींवर १ नोव्हेंबर २०१४ पासून मर्यादा आणण्याचा निर्णय घेणारा आदेश अलीकडेच जारी केला. परंतु रिझव्‍‌र्ह बँकेच्या याच परिपत्रकाच्या तपशिलात पाहिल्यास, नोव्हेंबरनंतरही मासिक कमाल १३ एटीएम उलाढाली बँक ग्राहकाला नि:शुल्क मिळविता येऊ शकतील, असे आढळून येते.

Read more...
 
‘सरकारी बँकांना सुधारणार’
अर्थविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 05:54

‘सरकारी बँकांना सुधारणार’

सरकारी बँकांमधील भ्रष्टाचाराची उघड होत असलेली प्रकरणे अस्वस्थ करणारी असून झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सरकारी बँकांचे व्यवस्थापन व्यावसायिक तसेच रिस्क मॅनेजमेंटची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार पावले टाकत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंडियन बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्पष्ट केले.

Read more...
 
मारुती, ह्युंदाई स्वस्त झाल्या
अर्थविषयक बातम्या
Thursday, 20 February 2014 05:28

मारुती, ह्युंदाई स्वस्त झाल्या

Feb 20, 2014, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटर इंडिया यांनी बुधवारी आपल्या कारच्या किंमतीमध्ये कपात करण्याची घोषणा केली. 'मारुती'ने आपल्या कारच्या किंमतीमध्ये ८,५०२ रुपये ते ३०,९८४ रुपयांपर्यंत कपात केली; तर ह्युंदाईने दहा हजार रुपये ते एक लाख ३५ हजार ३०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. ही दरकपात सर्व मॉडेलच्या कारवर लागू करण्यात आल्याचे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी १७ फेब्रुवारीला संसदेत मांडलेल्या हंगामी अर्थसंकल्पात कार आणि मोटारसायकलवरील उत्पादन शुल्कामध्ये चार टक्के कपात केली होती. यापार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमतीत कपात करीत असल्याची घोषणा केली. ह्युंदाईचे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, उत्पादन शुल्कातील कपातीमुळे गाड्यांचा किंमतीत ही कपात करण्यात आली आहे. ही दरकपात सर्व मॉडेल्सवर दहा हजार ते एक लाख ३५ हजार ३०० रुपयांपर्यंत असेल.

 
ग्रामीण जीवन व्यवस्थापनाची प्रदीप लोखंडेंनी उलगडली युक्ती
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 17 September 2013 06:15

ग्रामीण जीवन व्यवस्थापनाची प्रदीप लोखंडेंनी उलगडली युक्ती

मुंबई: आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग आणि युक्ती मीडिया कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रूरल रिलेशन्स’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध सामाजिक उद्योजक प्रदीप लोखंडे यांनी मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आणि उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. संजय रानडे, अभ्युदय बॅंकेचे संचालक अशोक चाळके आणि युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदीप लोखंडे म्हणाले की, ‘ग्रामीण भारतात प्रचंड क्षमता असून जागतिक स्तरावर भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. परंतू भारतीय नागरिकांचे या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. या भागाला समजून घेतल्याशिवाय कोणत्याही उद्योजक अथवा विकासकाला पूर्णपणे यशस्वी होणे शक्य नाही. एकाच प्रकारचा विशिष्ट मानसिक ग्रह ही भारतीयांची सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे आपण विकसित राष्ट्र नसून विकसनशील आहोत हे भारतीय नागरिक विसरतात आणि व्यवस्थेवर टिका करतात. आपल्याकडे पादत्राणे एअर कंडीशन दालनात विकली जातात, भाज्या मात्र रस्त्यावर विकल्या जातात; अशा प्रकारची विरोधाभासी व्यवस्था आपल्याकडे बघायला मिळते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने जशी शहरांत पोहोचतात तशीच ती ग्रामीण भागातील घराघरांतही पोहोचतात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात प्रचंड फरक पडत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा ग्राहकांना घरबसल्या होत आहे. त्यामुळे येत्या २०२० सालापर्यंत नागरिकांना व्यवस्थेच्या बाबतीत चांगला-वाईटाचा फरक कळू लागेल. धर्म आणि जातव्यवस्थेचा पगडा कमी झालेला असेल आणि स्त्रियांचे खऱ्या अर्थाने सशक्तीकरण झालेले असेल.’
‘क्रिकेट असो वा आय.टी आज प्रत्येक क्षेत्रात छोट्या शहरातील वा ग्रामीण भागातील तरूण आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. प्रदीप लोखंडे यानी ४००० खेड्यांना प्रत्यक्ष भेटी दिलेल्या असल्यामुळे त्यांचे ज्ञान मुंबई विद्यापीठातील लोकांना मिळावे याकरिता युक्ती आणि मुंबई विद्यापीठातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला’, असे युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत म्हणाले.
प्रदीप लोखंडेंनी ग्रामीण भागातील लोकसंख्या, बाजारपेठा, शिक्षणप्रणाली आणि ग्राहकांच्या सवयी आदी माहितीचा खजिना त्यांच्या यावेळी उलगडला. भारतातील ४००० खेड्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा अनूभवही त्यांनी यावेळी कथन केला.

 
‘स्वतःला घडवा आणि इतरांना ‘बि’ घडवा’
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 17 September 2013 06:14

‘स्वतःला घडवा आणि इतरांना ‘बि’ घडवा’

मुंबई- उद्योग करु इच्छिणारे, उद्योग करणारे, नव उद्योजक या सर्वांना उद्योगात यश मिळण्याची गुरुकिल्ली ‘२१ व्या शतकातील यशाची सूत्रे’ या कार्यक्रमातून मिळणार आहे. ‘बिझनेस थॉटस’ या संस्थेने आजच्या तरुण उद्योजकांना ‘२१ व्या शतकातील यशाची सूत्रे’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे. सदर मार्गदर्शन बिझनेस थॉट्सचे संचालक राजेश जाधव करणार आहेत.
नाव नोंदणीसाठी संपर्क- रोहिणी घुले - ९८७०९२२२६०

दिनांक : शनिवार, २४ सप्टेंबर २०१३
वेळ : सकाळी १०.०० ते संध्यकाळी ६.००
स्थळ : एमआयसी सभागृह, पहिला माळा, हेन्द्रे कॅसल, ऍश लेन,
गोखले(उत्तर) मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-२८

 
‘जगण्याविषयी बोलू काही’ प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांचे उद्योजकांवर सोळा संस्कार
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 10 September 2013 12:25

‘जगण्याविषयी बोलू काही’
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांचे उद्योजकांवर सोळा संस्कार

मुंबई - प्रत्येक उद्योजक आपापल्या उद्योजकीय व्यापात एवढा गुंतलेला असतो की त्याला स्वत:ला वेळ देण्याइतपत वेळ नसतो. जशी आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते तशीच आपल्या मनाला देखील मशागतीची गरज असते. ही गरज ध्यानात घेऊन ‘बिझनेस थॉट्स’ या संस्थेने ‘जगण्याविषयी बोलू काही’ या कार्यशाळेचे मंगळवारी सायंकाळी, दादर(पश्चिम) येथे आयोजन केले होते. या कार्यशाळेस प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बिझनेस थॉट्सचे संचालक राजेश जाधव देखील उपस्थित होते.
उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना दा. कृ. सोमण यांनी उद्योजकीय जगतातले तसेच दैनंदिन जीवनातील काही दाखले दिले. आजच्या काळातील कोणत्याही व्यक्तीस उपयुक्त ठरतील अशा सोळा संस्काराची त्यांनी माहिती दिली. या सोळा संस्कारामध्ये शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य, बुद्धीचे आरोग्य, ध्येयनिश्चिती, वेळेचे व्यवस्थापन, शिस्त, संपर्क, श्रमसंस्कार, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, सुजाण पालकत्व, आर्थिक नियोजन, वैज्ञानिक दृष्टीकोन, छंद, कर्मयोगाचे महत्व आणि प्रश्न सोडविण्याची कला आदींचा समावेश त्यांनी केलेला आहे. हे सर्व संस्कार कोणत्याही व्यावसायिकाने अथवा सर्वसामान्य माणसाने अंमलात आणले तर त्याचा कायापालट होऊ शकतो असे सूतोवाच त्यांनी केले.
“हे सोळा संस्कार जी व्यक्ती आचरणात आणेल ती नक्कीच यशस्वी होईल”, असे गौरवोदगार बॅंक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक दिलीप बेन्द्रे यांनी काढले. यावेळी दा. कृ. सोमण यांना ‘बिझनेस थॉट्स’चे संचालक राजेश जाधव यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास विख्यात हस्ताक्षर विश्लेषक शुभदा जहागिरदार, मराठी इंटरनॅशनल क्लबचे समन्वय सतीश रानडे, नेटवर्क बिझनेस फोरमचे संचालक राम कोळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla