डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम

मुंबईतील आणखी एक भव्य वस्तूसंग्रहालय म्हणजे भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. १५८ वर्ष जुने असलेले हे वस्तुसंग्रहालय जिजामाता उद्यानजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुने म्युझियम असल्याचा मन पटकावणाऱ्या या म्युझियममध्ये मुंबई विषयीचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. मुंबईच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक कलावस्तू व ग्रंथ  या संग्रालयात आहेत. १८३२ साली  पॅलेडियन वास्तुशैलीत या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून वास्तूसंग्रहालयाचे नक्षीदार खांब, त्याच्या छतावरील नक्षीकाम तसेच अन्य कलाकुसर बघण्यासारखी आहे. नयनरम्य अशा  वास्तुमध्ये भूतकाळाचा वेध घेताना आपण भान हरवून बसतो. १९ व्या शतकातील चित्रकलेचे दालन, बाहुल्यांच्या मदतीने मुंबई आणि भारताची संस्कृती दाखवणारी कमलनयन बजाज दालन हेही येथील एक वैशिष्ट्य मानले जाते. या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई सेंट्रल किंवा  महालक्ष्मी स्थानकावरून व हार्बर रेल्वेच्या भायखळा, डॉकयार्ड रोड व रे रोड या स्थानकावरून जाऊ शकता.  

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम,
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळ,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
भायखळा(पूर्व).

सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत सुरु असते.

वेळ:- सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत(बुधवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद)
प्रवेश शुल्क:- पाच ते पंधरा वर्षे: ५ रुपये,
               विद्यार्थ्यांसाठी : २ रुपये,
               प्रौढांसाठी : १० रुपये 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla