सिध्दीविनायक गणपती

मुंबईतील प्रसिध्द असणारे सिध्दीविनायक हे मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. लक्ष्मण विठू पाटिल आणि देऊबाई पाटिल यांनी हे मंदिर इ. स. 1801 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी बांधल्याचे मुंबईतील देवालये या के. रघुनाथजी यांच्या ग्रंथात आढळतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री सिध्दीविनायकाची ओळख आहे. गणपतीची मूळ मुर्ती 2.6 इंच व 2 इंच रुंद असून एका काळ्या दगडात बनवलेली आहे. उजवी सोंड, माथ्यावर मुकुट, चार हात, दोन हातात अंकुश आणि कमळ, खालच्या दोन हातांपैकी उजव्या हाती माळ आणि डाव्या हाती मोदकाची वाटी, मूर्तीच्या गळ्यात सर्पाचे जानवे असे या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे.

उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ असल्यामुळे तो सिध्दीविनायक म्हणून ओळखला जातो. तसेच या गणपतीला लग्नी गणेश असे ही म्हटले जाते. सकाळी 6 वाजता यथासांग पूजा व अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.

जवळचे स्टेशन – दादर.

दादर स्टेशन वरुन पायी 10 ते 15 जाऊ शकतो. तर शेअर टॅक्सी व बस ही उपलब्ध आहेत.


View Larger Map
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla