प्रवासी विमा पॉलिसी        

कदाचित आपणास माहिती नसेल म्हणून ......
सर्वसाधारणपणे परदेशी जाणाऱ्या लोकांसाठी जो विमा केला जातो त्यामध्ये काही अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टींचा समावेश केला जातो. जसे की,
१. वैद्यकीय मदत (Medical Insurance ) ज्याच्यामध्ये जर का आपणास परदेशात असताना रुग्णालयात जाण्याचा प्रसंग आला तर त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.
२.प्रवासाच्या दरम्यान जर तुमचा पासपोर्ट हरवला तर तो परत मिळवून घेण्यासाठी जो खर्च येतो त्याची भरपाई मिळू शकते.
३. अपघात : जर कोणत्याही कारणास्तव कोठेही कधीही अपघात झाला आणि त्यामुळे शारीरिक हानी झाली तर त्यासाठी सुद्धा भरपाई मिळू शकते.
४.    प्रवासात जर बॅगेज हरवले तर त्यासाठी सुद्धा भरपाई मिळू शकते.
५. परदेशात गेल्यानंतर विमानतळावर आपणास आपले समान जर १२ तासांपेक्षा जास्त उशिराने मिळाले तर त्यासाठी सुद्धा भरपाई मिळू शकते.
६. परदेशात वास्तव्य असताना तुमच्या निष्काळजीपणामुळे जर कोणाचे वैयक्तिक नुकसान झाले तर त्याला विमा संरक्षण मिळू शकते. 
वर उल्लेक्षित विमा संरक्षण हे सर्वसाधारणपणे उपलब्ध असतेच पण सध्याच्या बदललेल्या परिस्थिती प्रमाणे किंवा लोकांच्या गरजांचा विचार करून आता विमा कंपन्यांनी काही वेगळ्या प्रकारचे विमा संरक्षण देऊ केले आहे जसे की,

१. आपण परदेशात असताना जर आपल्या मायदेशातील घराचे भूकंप, आग किंवा घरफोडीच्या कारणास्तव नुकसान झाले तर.
२. आपण विमान तळावर जाताना रस्त्यात जर अपघात झाला तर.
३. प्रवासादरम्यान आपला लॅपटॉप हरवला तर.
४. परदेशी असताना आपणास जर कोणत्याही कारणांनी दुभाषाची गरज भासल्यास.
५. परदेशी असताना आपणास जर पैशाची गरज भासली तर.
६. प्रवासादरम्यान आपल्याबरोबर जर आपली मुले असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठी खास व्यवस्था उपलब्ध होऊ शकते.
आणि या व्यतिरिक्त आणखीही वेगवेगळ्या स्वरूपाचे विम्याचे संरक्षण मिळू शकणारी विमा पॉलिसी आता उपलब्ध आहे.
या करता आपणास अधिक माहिती आणि विनाविलंब सेवा मिळण्यासाठी खालील पत्त्यावर संपर्क साधा .

श्री. अ. पु. गोखले
इ - २/७०३ विजय नगर सोसायटी
स्वामी नित्यानंद मार्ग , अंधेरी (पूर्व ), मुंबई - ६९
दूरध्वनी क्र. - २६८३२२३३
भ्रमणध्वनी : ९८६९५२६१५२

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla