भटकंती लेख
|
फिरण्यासाठी आता सेल्फ ड्राइव्ह ट्रॅव्हलचा ट्रेण्ड..
दिवाळीच्या सुट्टीत आता फिरायला जाताना तिकिटांची , रीझर्वेशनची कसलीही चिंता नको. आता आपली गाडी घेऊन जाऊ पण गाडी लांब कशी न्यायाची अजून मोठी हवी,अशा चिंता आता नकोत. आता नवीन ट्रेंड आलाय ज्याने तुम्हाला स्वत:च्या सोयीने सुट्टीत भटकंती करता येईल. त्यासाठी स्वत:ची गाडीच हवी, असेही नाही. गाडी तासाच्या, दिवसाच्या, महिन्याच्या भाडेबोलीवर घ्यायची आणि ड्राइव्ह करत इच्छित स्थळ गाठायचे. यातून दुहेरी आनंद मिळतो, एक म्हणजे, ड्रायिव्हगचे समाधान आणि दुसरे म्हणजे कोणताही खोळंबा न होता इच्छित स्थळी जाता येणे.. तुम्हाला हवी तशी गाडी बुक करायची आणि निघायचं..
|
Read more...
|
भटकंती लेख
|
देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे
नवरात्रोत्सवाला आता प्रारंभ होत असून प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते.
पहिले शक्तीपीठ- श्रीमहालक्ष्मी माता (कोल्हापूर)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मी-देवीचा सदैव वास असतो. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्या काळ्या दगडात केलेली आहे.देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे. |
Read more...
|
भटकंती लेख
|
खास पावसाळी पिकनिक साठी … (पावसाळी पिकनिकची ठिकाणे)
नुकताच पावसाळा सुरु झाला वातावरणात कमालीचा गारवा तयार झाला. अशा या चिंब पावसात भिजण्याची आणि आनंद लुटण्याची तयारी लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वाची असते. तरुणांचे कुठे ट्रेकला जाण्याचे तर कुठे वन डे पिकनिकला जाण्याचे बेत सुरु होतात. कोणी आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत तर कोणी आपल्या परिवारासोबत हा पावसाचा आनंद लुटण्यास वन डे पिकनिक का होईना फिरायला जाण्याचे बेत आखतात. मग कोणी माळशेज घाट तर कोणी अगदी लोहगड अशा अनेक ठिकाणी जाऊन पावसात भिजण्याचा आनंद पूर्ण करत. अशाच अनेक पावसाळी पिकनिक ठिकाणांची माहिती आपल्या वाचकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हा पावसाळी पिकनिक ठिकाणांचा घेतलेला आढावा.
|
Read more...
|
भटकंती लेख
|
पाऊस वेड्यांचा पावसाळा !!
कवीच्या लेखणीतून कविता होऊन बाहेर पडणारा पावसाळा आला, चिमुकल्यांच्या हातून होडी बनून पाण्यात वाहणारा पावसाळा आला, मित्रांच्या सोबत चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा पावसाळा आला, आणि प्रेयसीसोबत समुद्रकिनारी भिजणारा पावसाळा आला…….
आणखी बऱ्याच प्रकारे आपल्याला या ऋतूचे वर्णन करता येईल. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आपण या ऋतूला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलेले असते. |
Read more...
|
भटकंती लेख
|
गुलाल उधळीला जणु !
आम्ही वीस माणसे कलकत्त्याहून जलपायगुडी येथे आलो. डोशांचा भरपूर समाचार घेतला. चहा पिऊन दार्जीलिंग येथे जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो, छोटी गाडी, रेल्वेच्या रुळांच्या अगदी जवळून जाणारा बसचा रस्ता पाहून मजा वाटत होती.( खरे तर आराधना पिक्चर ने या गाडीला अमर केले आहे ) न्यू जलपायगुडी येथे आमच्या गाडीच्या प्रत्येक तीन डब्यांना एक इंजिन जोडले. एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या व त्या झुक झुक करत निघाल्या. लांब अंतरावरून दिसणाऱ्या धुरावरून आमच्या गाडीचा एखादा भाग कुठे आहे हे ओळखता येत होते.
|
Read more...
|
भटकंती लेख
|
प्रवासी विमा पॉलिसी
कदाचित आपणास माहिती नसेल म्हणून ......
सर्वसाधारणपणे परदेशी जाणाऱ्या लोकांसाठी जो विमा केला जातो त्यामध्ये काही अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टींचा समावेश केला जातो. जसे की, १. वैद्यकीय मदत (Medical Insurance ) ज्याच्यामध्ये जर का आपणास परदेशात असताना रुग्णालयात जाण्याचा प्रसंग आला तर त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. २.प्रवासाच्या दरम्यान जर तुमचा पासपोर्ट हरवला तर तो परत मिळवून घेण्यासाठी जो खर्च येतो त्याची भरपाई मिळू शकते. |
Read more...
|
|
|
|