Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पहिले विमान उतरले पवना धरणात!
पर्यटनविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:14

पहिले विमान उतरले पवना धरणात!

महाराष्ट्रातील सी-प्लेन सेवा सुरू; 15 सप्टेंबरपर्यंतचे आरक्षण पूर्ण
मुंबई - समुद्रावरून जाणाऱ्या विमानातून अनेकदा प्रवास केलाय... पण एरव्हीचे लॅण्डिंग आणि आकाशातून थेट पाण्यावर उतरण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. तो आनंद शब्दांत व्यक्त करणे शक्‍य नाही, असे दिल्लीहून खास "सी-प्लेन‘ची सवारी करण्यासाठी आलेल्या विश्‍वेश शर्मा यांनी सांगितले. हवेतून जमीन आणि पाण्यावरही उतरू शकणाऱ्या "सेसना 208‘ या नऊ प्रवासी बसू शकणाऱ्या "ऍम्फिबियन‘ प्रकारच्या सी-प्लेन सेवेचे सोमवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक जगदीश पाटील यांच्या हस्ते विलेपार्ले येथील जुहू विमानतळावर उद्‌घाटन करण्यात आले.

जुहू ते पवना धरण अशी ही महाराष्ट्रातील पहिली सी-प्लेन सेवा सुरू झाली आहे. पर्यटन विकास महामंडळ व मेहेर कंपनी यांच्या वतीने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले आहे; मात्र बहुतांश पर्यटनस्थळे मुंबईपासून लांब असल्याने ती या सेवेद्वारे जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सोमवारपासून गुरुवारपर्यंत दररोज सकाळी 10.30 वाजता आणि शुक्रवारपासून रविवारपर्यंत सकाळी 10.30 आणि दुपारी 4.30 वाजता ही विमाने उड्डाण करणार आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यावर या फेऱ्या वाढवण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मेहेर कंपनीचे अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी दिली. पवना धरणानंतर मुळा, धूम व गंगापूर या धरणांना या सेवेशी जोडण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील समुद्रकिनारे या सेवेशी जोडले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला निश्‍चितच बळकटी मिळेल, असा विश्‍वास एमटीडीसीचे संचालक जगदीश पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.

भाडे तीन हजार
सध्या "प्रमोशन ऑफर‘ म्हणून जुहू ते पवना या सेवेसाठी 3 हजार रुपये भाडे घेण्यात येत आहे. 15 सप्टेंबरपर्यंतचे आरक्षण झाले आहे, अशी माहिती मेहेर कंपनीने दिली. "208 सी-प्लेन‘मध्ये नऊ आणि "सेसना 206‘मध्ये चार प्रवासी बसू शकतात. दोन्ही सी-प्लेन महाराष्ट्राच्या सेवेत दाखल झाली आहेत.

‘सी-प्लेन‘चे सारथ्य जिगरबाज महिलेकडे
हे सी-प्लेन उडवणाऱ्या प्रियांका मनुजा महाराष्ट्रातच राहतात. "ऍम्फिबियन‘ प्रकारातील सी-प्लेन उडवण्याचा त्यांना तीन वर्षांचा अनुभव आहे. साधारण दोन वर्षे त्या अंदमान -निकोबार बेटांवर सी-प्लेन चालवण्याचे प्रशिक्षण घेत होत्या. ही सेवा सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. साताऱ्यात राहणारा सहवैमानिक निखिल जाधवही त्यांच्यासोबत आहे.

साभार - सकाळ ePaper

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla