Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सी-प्लेन चे पहिले उड्डाण २५ ऑगस्ट रोजी
पर्यटनविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 05:43

सी-प्लेन चे पहिले उड्डाण २५ ऑगस्ट रोजी

बराच गाजावाजा करण्यात आलेल्या सी-प्लेनचे पहिले उड्डाण आता २५ ऑगस्ट रोजी मुंबईपासून लोणावळ्याच्या पवना धरणापर्यंत निश्चित करण्यात आले असून माणशी २,९९९ रुपयांत पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येईल, असे मेहेर कंपनीने घोषित केले आहे.

मेहेर कंपनी व एमटीडीसी यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी सी-प्लेनची सेवा देण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी जुहू विमानतळावर केली होती. त्यानंतर सी-प्लेनचे लोणावळ्याच्याच अॅम्बी व्हॅली येथे होणारे पहिले उड्डाण सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या अटकेमुळे रद्द झाले होते. सुमारे महिनाभरापूर्वी केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सी-प्लेनसाठी गिरगाव चौपाटीवर जागा देण्यात आली.

आता 'सेसना २०६' या चार आसनी व 'सेसना २०८' या नऊ आसनी विमानांनी महाराष्ट्रातील सी-प्लेन सेवेस सुरुवात करण्यात येत असून या सेवेमुळे पर्यटकांचा प्रवासातील बराच वेळ वाचेल. विमानतळ नसलेली ठिकाणे विमानसेवांनी जोडण्याचे हे चांगले माध्यम ठरेल, असे मेहेरचे संस्थापक संचालक सिध्दार्थ वर्मा म्हणाले. मेहेरच्या वेबसाइटवर पहिल्या सेवेचे बुकिंग उपलब्ध असेल. सी-प्लेनची सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.

साभार - महाराष्ट्र टाइम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla