Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
‘पॉवर’फूल मोबाईल लॉन्च
इन्फोटेक - बातम्या
Friday, 22 August 2014 05:57

‘पॉवर’फूल मोबाईल लॉन्च

सध्या फोन विकत घेताना त्यांच्या बॅटरीची क्षमता कीती हे पाहण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. दिर्घकाळ चालणा-या मोबाईल बॅटरीची वाढती मागणी लक्षात घेऊन मॅक्स कंपनीने आपला एमएक्स२०० हा नवीन फोन बाजारात आणला आहे. या फोनची खासियत म्हणजे हा मॅक्सच्या पॉवर हाऊस कॅटेगरीमधला खास बॅटरी असणारा फोन असून त्याची किंमत मात्र अगदी 'परवडेबल' आहे.

 

मॅक्सने लॉन्च केलेल्या एसएक्स२०० या फोनमध्ये ५२०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. या बॅटरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही बॅटरी तुम्ही पॉवर बॅकअप म्हणून वापरु शकता. या बॅटरीच्या सहाय्याने इतर मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. रफ बॉडी असणारी ही बॅटरी इतर नाजुक काळजीपूर्वक हाताळाव्या लागणा-या बॅटरीजपेक्षा सरस आहे. फक्त या फोनची बॅटरी मोबाईलमधून काढता येणार नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मॅक्सने लॉन्च केलेल्या एमएक्स१०० या फोनची ही सुधारीत अवृत्ती आहे. १९३२ रुपये किंमतीला लॉन्च झालेल्या एमएक्स१०० मध्ये ४४०० एमएएच क्षमतेची बॅटरी होती.


मॅक्स एसएक्स२००ची वैशिष्ट्ये

२.४ इंचाची स्क्रीन

मेमरी कार्डच्या सहाय्याने ८ जीबी पर्यंत मेमरी वाढवता येणार

इंग्रजीबरोबरच हिंदी आणि गुजराती भाषा वापरण्याची सोय

ब्लूटूथ

एफएम रेडिओ

मल्टिमीडिया सपोर्ट (ऑडिओ प्लेअर, व्हिडीओ प्लेअर आणि रेकॉर्डींग)

३.५ एमएम हेडफोन

जीपीआरएस

रेअर व्ह्यू कॅमेरा (फ्लॅश नाही)

काळ्या आणि भगव्या रंगामध्ये उपलब्ध

किंमत - १८४८ रुपये

साभार - महाराष्ट्र टाइम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla