Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
गोरेगाव- मुलुंड रस्त्याचा मार्ग मोकळा
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 06:23

गोरेगाव- मुलुंड रस्त्याचा मार्ग मोकळा

आरे कॉलनीतील रस्ता पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर आता गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला गती मिळाली आहे. वनक्षेत्रातून जात असलेला हा रस्ता मंजुरीप्रक्रियेत अडकला होता, मात्र आता त्याच्या आराखडय़ात बदल करण्यात आले असून येत्या तीन महिन्यांत निविदा मागवण्यात येतील. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडनंतर पश्चिम व पूर्व उपनगरे जोडणाऱ्या योजनेतला हा तिसरा व शेवटचा रस्ता आहे. गोरेगाव व मुलुंड यांना जोडणारा हा रस्ता १६ किलोमीटर लांबीचा असून त्यात सात किलोमीटर लांबीच्या आरे कॉलनी रस्त्याचा समावेश आहे. आरे कॉलनीतील सध्या दुपदरी असलेला मार्ग चौपदरी केला जाणार आहे. तसेच या रस्त्याचे काँक्रिटीकरणही होईल. उर्वरित रस्त्यावर साकीविहारपासून मुलुंडच्या एलबीएस रोडपर्यंत तब्बल ९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाईल. प्रस्तावित तीन लिंक रोडपैकी गोरेगाव-मुलुंड रस्ता हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जात असल्याने त्याच्या मंजुरीत अडथळे आले होते. शिवाय रस्त्याच्या काही भागांत बोगद्याचेही काम करावे लागणार असल्याने विलंबाची शक्यता होती. मात्र आता पालिकेने आराखडय़ात बदल केले असून त्यामुळे कमीत कमी झाडे तोडावी लागतील, असा पालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे.

साभार - लोकसत्ता

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla