Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ठाण्यात टॉवर संस्कृतीला लगाम
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 22 August 2014 06:07

ठाण्यात टॉवर संस्कृतीला लगाम

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बिल्डरांवर चार चटईक्षेत्राची खैरात करत ठाणे, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये आखलेली भाडेतत्त्वावरील घरांची योजना राज्य सरकारने गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे सुधारित धोरण आखण्यात आले असून विकासकांना यापुढे चारऐवजी तीन चटईक्षेत्र निर्देशांकानुसार ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसारख्या शहरांमध्ये 'परवडणारी घरे' उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ही परवानगी देताना दाटीवाटीचे क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे ठाण्यासारख्या शहरात अरुंद रस्त्यांना लागून गगनचुंबी इमारती उभारण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. आता ठाणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी सध्या छोटय़ा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची 'टॉवरस्वप्ने' संपुष्टात येणार आहेत.
लहान आणि किफायतशीर घरांची उपलब्धता वाढावी यासाठी राज्य सरकारने मध्यंतरी भाडेतत्त्वावरील घरांची योजना पुढे आणली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात (नवी मुंबईवगळून) ही योजना राबविण्यासाठी विकासकांवर तब्बल चार चटईक्षेत्र निर्देशांकाची खैरात करण्यात आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चटईक्षेत्र पदरात पाडून उभ्या राहिलेल्या विकास प्रकल्पांमुळे शहरांच्या नियोजनाचा बोऱ्या वाजेल, अशा स्वरुपाच्या तक्रारी त्यावेळी ठाणे, कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांनी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींना सरकारने केराची टोपली दाखवली. चार चटईक्षेत्र निर्देशांकानुसार एकटय़ा ठाणे शहरात सुमारे १२ पेक्षा अधिक प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.
दरम्यान, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चटईक्षेत्र पदरात पाडून घेऊन जेमतेम १८० चौरस फुटांची घरे भाडेतत्त्वासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने ही घरे ओस पडल्याचे चित्र आहे. वर्तकनगर भागातील घरांमध्ये मुंब्रा परिसरातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे या भाडेतत्त्वावरील घरांची योजना मोडकळीस आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी या योजनेतील विकास प्रकल्पांना दाटीवाटीच्या क्षेत्रातही बांधकाम परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मूळ ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट यासारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात काही प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. यामुळे ठाण्यासारख्या आधीच नियोजनाच्या आघाडीवर फसलेल्या शहराचे तीनतेरा वाजले आहेत.

साभार - लोकसत्ता

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla