Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ग्राहकांसाठी 'कार्पेट एरिया'चे 'रेड कार्पेट'
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:20

ग्राहकांसाठी 'कार्पेट एरिया'चे 'रेड कार्पेट'

Maharashtra Times |6 June 2013

' बिल्टअप ,' ' सुपर बिल्टअप ' असे फंडे आता बांधकाम व्यवसायातून कागदोपत्री हद्दपार होणार असून भविष्यात फक्त ' कार्पेट एरिया ' चीच विक्री करता येणार आहे . केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच मान्य केलेल्या रियल इस्टेट नियमनाच्या मसुद्यामध्ये या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे .

बहुचर्चित रियल इस्टेट नियमन विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली . त्यामध्ये बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि बांधकाम प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासह ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत . या विधेयकातील तरतुदी फक्त निवासी बांधकामांना लागू होणार आहेत . आतापर्यंत इमारतींमध्ये बिल्टअप किंवा सुपर बिल्टअप एरिया गृहित धरून विक्री करण्यात येत असे . मात्र , यापुढे या दोन्ही संज्ञा गैरलागू ठरणार असून फक्त कार्पेट एरियाचीच विक्री करावी , अशी तरतूद करण्यात आली आहे . या कायद्यानुसार प्रत्येक राज्यात रियल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटीची ( नियमन प्राधिकरण ) स्थापना होणार असून केंद्रीय स्तरावर अपीलीय प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे . यापुढील काळात प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी या प्राधिकरणाकडे बंधनकारक ठरविण्यात आली असून ही नोंदणी करण्यापूर्वी महापालिकेस अन्य सर्व परवानग्या घेण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे .

या प्राधिकरणापुढे ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील वाद किंवा तंटे वेगाने सोडविण्याची यंत्रणा ( फास्ट ट्रॅक ) उभी करण्यात येणार आहे . गेल्या काही काळात असे तंटे वर्षानुवर्षे रखडल्याने ग्राहकांची अडचण होण्याचे प्रसंग घडत होते . तसेच या क्षेत्रात पारदर्शकता यावी , यासाठी रियल इस्टेट एजंट्सचीही नोंदणी बंधनकारक ठरविण्यात आली आहे . या कायद्यामध्ये अपार्टमेंट , कॉमन एरिया , कार्पेट एरिया , रियल इस्टेट प्रोजेक्ट यांच्या व्याख्याही निश्चित करण्यात आल्या आहेत . बांधकाम प्रकल्प वेळेत पूर्ण करणे , या व्यवसायात पारदर्शकता आणणे यासाठी कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या असून काही तरतुदींचा भंग केल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे .

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla