Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
53 गणेशोत्सव मंडळांना मोफत विमा
विशेष बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:34

53 गणेशोत्सव मंडळांना मोफत विमा

मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण
मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी आण त्यातून दुर्घटना किंवा घातपाताचा असलेला धोका लक्षात घेता, मंडळांना स्वस्तात विम्याचे सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 8 ने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे दक्षिण मुंबईतील 53 मंडळांना यंदा मोफत विम्याचे संरक्षण मिळाले आहे. महागड्या प्रीमियममुळे आतापर्यंत विमा ही केवळ बड्या मंडळांचीच मक्तेदारी होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मंडळांना विम्याचे कवच मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीने अवघ्या तीन हजारांच्या एकरकमी प्रीमियममध्ये दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट, आगी, लूट, गणेशमूर्तीवरील आभूषण चोरी, दानपेटीतील चोरी अशा आठ प्रकारांत प्रत्येकी एक लाखांपर्यंतचा विमा योजना तयार केली आहे. पावणेतीन लाखांच्या प्रीमियममध्ये विम्याची ही रक्कम दोन कोटींपर्यंत आहे. त्याचबरोबर 50 कार्यकर्त्यांना 50 हजार ते एक लाखापर्यंचा अपघाती विमाही आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी "एस. डी. कॉर्पोरेशन कंपनी‘च्या मदतीने मंडळांना हा मोफत विमा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कुलाबा, चिराबाजार, गिरगावसह दक्षिण मुंबईच्या विविध भागांतील 53 मंडळांना सोमवारी संध्याकाळी चिराबाजार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात विम्याची प्रमाणपत्रे दिली. शिवसेनेच्या उपनेत्या मीनाताई कांबळे, रवींद्र मिर्लेकर, "बेस्ट‘चे अध्यक्ष अरुण दुधवडकर, नगरसेवक संपत ठाकूर, महिला विभाग संघटक माई परब आणि "ओरिएंटल‘चे सहायक व्यवस्थापक सचिन खानविलकर या वेळी उपस्थित होते. कंपनीच्या नियमाप्रमाणे नोंदणीकृत मंडळांनाच विमा देणे शक्‍य आहे. त्याप्रमाणे आणखी जवळपास 50 मंडळांना मोफत विम्याचा लाभ आम्ही देऊ शकतो, असे सकपाळ यांनी सांगितले.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla