Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ई-कॉमर्स कंपन्यांचे लवकरच IPO
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:13

ई-कॉमर्स कंपन्यांचे लवकरच IPO


Jun 26, 2014
दिल्ली/मुंबईः देशातील आघाडीच्या एकूण कंझ्युमर इंटरनेट कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांनी शेअर बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, देशातील या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूकदारांनी रुची दाखवली आहे;

त्याचाच फायदा उचलण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली आहे. सध्या या कंपन्यांकडून 'आयपीओ' बाजारात दाखल करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट बँकांसमवेत बोलणी सुरू आहेत.

 

'आयपीओ' बाजारात आणण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून 'ई-कॉमर्स' कंपन्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भरतीही अवलंबली आहे. 'आयपीओ' खुला करण्यापूर्वी या कंपन्यांकडून रिस्क कॅपिटल इन्व्हेस्टरनाही शेअर विक्री करण्याची दाट शक्यता आहे. देशातील सर्वांत मोठी ऑनलाइन रिटेल कंपनी असणाऱ्या 'फ्लिपकार्ट'मध्ये सध्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पद लवकरच भरण्यात येणार आहे. 'आयपीओ'साठी मर्चंट बँकांशी चर्चा करण्यासमवेतच कंपन्या फायनान्स टीमच्या मजबुतीकरणावरही भर देत आहेत.

ऑनलाइन रिटेल कंपनी असणाऱ्या 'इन्फिबीम'ने तर सर्व कंपन्यांच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. कंपनीने अॅक्सिस कॅपिटल आणि कोटक इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यासमवेत लिस्टिंगचीही तयारी सुरू केली आहे. या आयपीओमधून ५०० कोटींचे भांडवल गोळा करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अहमदाबादस्थित 'इन्फिबीम'चे संस्थापक विशाल मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांव्यतिरिक्त आम्ही आयपीओ आणण्याचा गंभीरपूर्वक विचार करीत आहोत. या संदर्भात माहिती देण्यास 'स्नॅपडील' आणि 'फ्लिपकार्ट'च्या प्रतिनिधींनी नकार दिला. या व्यतिरिक्त ट्रॅव्हल पोर्टल यात्रा डॉट कॉम, फॅशन रिटेलर जबाँग डॉट कॉम आणि विवाहविषय पोर्टल भारत मॅट्रिमनी डॉट कॉम यांनीही आयपीओ बाजारात दाखल करण्याचे नियोजन केले आहे.

साभार : महाराष्ट्र टाईम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla