Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
कारखरेदीसाठी बँकांकडून १०० टक्के कर्ज
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:13

कारखरेदीसाठी बँकांकडून १०० टक्के कर्ज

Jun 26, 2014
कॉर्पोरेट्सकडून असणारी वाहन कर्जाची मागणी घसरल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी काही खासगी बँकांनी कारखरेदीसाठी १०० टक्के कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

मे महिन्यात कारविक्रीमध्ये झालेल्या वृद्धीच्या पार्श्वभूमीवर बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली आहे. मात्र या योजनेतून बँकांना फायदा होण्याऐवजी बुडित कर्जांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

कारखरेदीसाठी शंभर टक्के कर्ज उपलब्ध करून देणाऱ्यांमध्ये अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कोटक महिंद्र बँकेने कारखरेदीसाठी ९५ टक्के कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. शिवाय काही बँकांनी इन्शुरन्ससाठीही कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. अशा योजना कार खरेदी करणारा ग्राहक आणि कार कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी, कर्जाची सोय उपलब्ध करणाऱ्या बँकेसाठी घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित मालमत्तेचे मूल्य लक्षात घेता, त्याच्या मूल्यावर देण्यात येणारे कर्जाचे प्रमाण बँकांसाठी जोखमेची बाब आहे. एखाद्या वस्तूसाठी देण्यात येणारे कर्ज त्या वस्तूच्या अथवा मालमत्तेच्या मूल्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. मात्र बँकांकडून कार खरेदीसाठी देण्यात येणारे कर्ज कारच्या किमतीइतकेच असल्याने ते धोकादायक आहे.

साभार : महाराष्ट्र टाईम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla