विशेष बातम्या
|
Tuesday, 26 August 2014 04:34 |
53 गणेशोत्सव मंडळांना मोफत विमा
मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी आण त्यातून दुर्घटना किंवा घातपाताचा असलेला धोका लक्षात घेता, मंडळांना स्वस्तात विम्याचे सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 8 ने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे दक्षिण मुंबईतील 53 मंडळांना यंदा मोफत विम्याचे संरक्षण मिळाले आहे. |
Read more...
|
विशेष बातम्या
|
Tuesday, 26 August 2014 04:20 |
"बंद'च्या अफवेने पेट्रोलपंपांवर रांगा
पुणे - स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात राज्यातील पेट्रोलपंपचालकांनी "बंद‘ पुकारला असला तरी, पुण्यातील पेट्रोलपंप सुरूच राहणार आहेत. "बंद‘च्या अफवेमुळे पुणेकरांनी इंधन भरण्यासाठी धावाधाव करीत पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली. |
Read more...
|
विशेष बातम्या
|
Friday, 22 August 2014 06:27 |
दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी पुणे नगर वाचन मंदिराचा प्रकल्प
वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी गेली १६६ वर्षे कार्य करीत असलेल्या पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आधुनिकतेची कास धरीत दुर्मिळ ग्रंथसंपदेच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला आहे. आपल्या संग्रहातील ग्रंथांचे डिजिटायझेशन करतानाच अन्य संस्था आणि व्यक्तींच्या संग्रहातील ग्रंथांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
|
Read more...
|
विशेष बातम्या
|
Friday, 22 August 2014 05:56 |
भारताच्या वेंकट राहुलला रौप्यपदक
भारताला अखेर युथ ऑलिम्पिक पदकाचे खाते उघडण्यात यश आले. वेंकट राहुलने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवले. त्याचबरोबर ११० मीटर अडथळा शर्यतीत मायमोन पावलोस आणि थाळीफेकमध्ये मित्रावरुणने आगेकूच केली. तर, बॅडमिंटनमध्ये आदित्य जोशीला ब्राँझपदकाची संधी आहे. नानजिंग येथे ही सुरू असलेल्या या स्पर्धेत वेंकट राहुलने ७७ किलो गटात दुसरा क्रमांक मिळवला. |
Read more...
|
विशेष बातम्या
|
Wednesday, 20 August 2014 04:32 |
मुंबईकरांचा ‘शाडूगणेश’
पर्यावरणरक्षणासाठी सुरू झालेल्या शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या प्रसाराला आता चांगले यश येत असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव समन्वय समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अंदाजे ३० हजार शाडूच्या गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापना मुंबईत झाली होती. यंदा हाच आकडा २० हजारांनी वाढला आहे. विशेष म्हणजे, अनेक सार्वजनिक मंडळांनीही समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूजेसाठी शाडूची गणेशमूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजेच शिवडीच्या राजाची गणेशमूर्ती १० फूट उंचीची असते. पण मंडळाने पूजेच्या ठिकाणी यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. 'पर्यावरण रक्षणासाठी हा आमचा छोटा प्रयत्न आहे. भविष्यात चांगले पर्याय निर्माण झाल्यास मोठी मूर्तीही इकोफ्रेंडसी करण्याचे आम्ही ठरवले आहे,' असे मंडळाचे अध्यक्ष विजय इंदूलकर यांनी सांगितले. पालनजी रतनजी चाळ सार्व. गणेशोत्सव मंडळानेही हाच कित्ता गिरवत पूजेसाठी शाडूची गणेशमूर्ती आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंडळांचे प्रमुख पदाधिकारी धनंजय बरदाडे यांनी सांगितले. यंदा स्थापनेची ७५ वर्षे साजरी करीत असलेली रंगारी बदक चाळ, पाटील इस्टेट (नाना चौक) सार्व. गणेशोत्सव मंडळ यांसह गिरगाव, विलेपार्ले, भांडुप अशा अनेक भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी असाच श्रीगणेशा केला आहे. - साभार - महाराष्ट्र टाइम्स |
विशेष बातम्या
|
Tuesday, 01 July 2014 11:13 |
ई-कॉमर्स कंपन्यांचे लवकरच IPO
Jun 26, 2014 दिल्ली/मुंबईः देशातील आघाडीच्या एकूण कंझ्युमर इंटरनेट कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांनी शेअर बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, देशातील या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूकदारांनी रुची दाखवली आहे;
|
Read more...
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
Page 1 of 4 |