Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Finance news of Mumbai and Pune in Marathi
ग्राहकांना सुवर्णखरेदीपासून परावृत्त करा
अर्थविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:46

ग्राहकांना सुवर्णखरेदीपासून परावृत्त करा

Loksatta |7th June 2013

अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे बॅंकांना आवाहन
आयातीला आलेले उधाण फार काळ टिकणार नाही़ त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदम्बरम यांनी बँकांना दिला आह़े सोन्यावरील आयात शुल्क ८ टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय बँक महासंघाच्या (आयबीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत चिदम्बरम यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े .

Read more...
 
४० व्या वर्षांत पदार्पणानिमित्त जनकल्याण बँकेचे नवीन संकेतस्थळ
अर्थविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:43

४० व्या वर्षांत पदार्पणानिमित्त जनकल्याण बँकेचे नवीन संकेतस्थळ

Loksatta |7th June 2013

मुंबईत कार्यरत सहकार क्षेत्रातील जनकल्याण बँकेने अलीकडेच ४० व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्त बँकेच्या मुख्यालयात www.jksbl.com या नवरचित संकेतस्थळाचे उद्घाटन अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या हस्ते झाले. तसेच यानिमित्ताने बँकेने आधारकार्ड संलग्न खाते उघडण्याची सुविधा आपल्या शाखांद्वारे उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली.

Read more...
 
म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनाच नव्हे, गुंतवणूकदारांच्या 'असमाधाना'लाही ओहोटी
अर्थविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 04:41

म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनाच नव्हे, गुंतवणूकदारांच्या 'असमाधाना'लाही ओहोटी

Loksatta|7June 2013

गेल्या वर्षांत म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूकदारांच्या तक्रारीत कमालीची घट झाली आहे. २०१२-१३ आर्थिक वर्षांत एकूण तक्रारींच्या प्रमाणात ११,७९२ ने म्हणजे तब्बल २० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)'च्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे. आघाडीच्या पाच म्युच्युअल फंडांपैकी तक्रारींमध्ये सर्वाधिक घट ही रिलायन्स म्युच्युअल फंडाबाबत दिसून आली आहे. तर या पाचांपैकी तक्रारींमध्ये वाढ केवळ आयसीआयसीआय म्युच्युअल फंडांबाबतीत अनुभवायास आली आहे.

Read more...
 
टीडीएस न भरल्यास दंडाची कारवाई
अर्थविषयक बातम्या
Thursday, 06 June 2013 11:38

टीडीएस न भरल्यास दंडाची कारवाई


Maharashtra Times |Jun 6, 2013

वृत्तसंस्था , नवी दिल्ली

टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) किंवा टीसीएसची (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) रक्कम वेळेत व अचूक न भरली गेल्यास इन्कम टॅक्स विभाग दंडात्मक कारवाई करणार आहे. करदात्यांना यासाठी २०० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

Read more...
 
चेक बाउन्सचे खटले लोक न्यायालयात?
अर्थविषयक बातम्या
Thursday, 06 June 2013 11:35

चेक बाउन्सचे खटले लोक न्यायालयात?

Maharashtra Times |Jun 6, 2013 ,नवी दिल्ली

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यात (एआय) सरकार लवकरच सुधारणा करणार आहे. यामुळे चेक बाउन्ससारख्या प्रकरणात बँकांना संबंधित व्यक्तीला कोर्टात खेचता येणार नाही. कायद्यातील प्रस्तावित तरतुदीनुसार लवाद किंवा लोक न्यायालयात अशा प्रकारच्या खटल्याची सुनावणी होणार आहे.

Read more...
 
सोने आणखी महागणार
अर्थविषयक बातम्या
Thursday, 06 June 2013 11:34

सोने आणखी महागणार

Maharashtra Times | Jun 6, 2013
नवी दिल्ली : सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे करंट अकाउंट तुटीवर दबाव वाढत असल्याने केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात दोन टक्के वाढ केल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यामुळे हे शुल्क आठ टक्क्यांवर गेले आहे. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा आयात शुल्क वाढले आहे. या निर्णयामुळे सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम पाचशे रुपये वाढ होणार असल्याचे कमॉडिटी तज्ज्ञांनी सांगितले.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla