Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
‘ईपीएफओ’च्या व्याजदराचा निर्णय मंगळवारी
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 04:03

‘ईपीएफओ’च्या व्याजदराचा निर्णय मंगळवारी

नवी दिल्ली : देशभरातील कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फन्ड ऑर्गनायझेशन'तर्फे ('ईपीएफओ') चालू आर्थिक वर्षातील ठेवींवरील व्याजदराचा निर्णय मंगळवारी (२६ ऑगस्ट) घेण्यात येण्याची शक्यता आहे.

'ईपीएफओ'च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मंगळवारी होणार असून, त्यामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी 'ईपीएफओ'ने ८.७५ टक्के दराने व्याज दिले होते, तर २०१२-१३ या वर्षात साडेआठ टक्के दराने व्याज देण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'ईपीएफओ'च्या वित्त, गुंतवणूक आणि हिशेब समितीची सोमवारी बैठक होणार असून, त्यामध्ये अंतिम व्याजदरावर चर्चा होणार आहे. सध्या देशभरात संस्थेचे पाच कोटींहून अधिक सदस्य आहेत.

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla