Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
नॅचरल गॅस भाववाढीची मागणी
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 26 August 2014 03:45

नॅचरल गॅस भाववाढीची मागणी

खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खननाच्या व्यवसायातील खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज, कैर्न इंडिया, 'बीपी' आणि सरकारी क्षेत्रातील ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ('ओएनजीसी') या कंपन्यांनी नैसर्गिक वायूची ४.२ अमेरिकन डॉलर दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स हा सध्या असलेला भाव वाढवावा अशी एकमुखी मागणी केंद्र सरकारकडे केली.

सरकारकडून नॅचरल गॅसचा उत्पादक कंपन्यांना दिला जाणारा भाव हा वादाचा मुद्दा बनलेला असून, अशी भाववाढ झाल्यास तिचा देतील सार्वत्रिक भावपातळीवर मोठा परिणाम होऊन महागाईचा भडका उडणार आहे.

याआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन 'युपीए' सरकारने नैसर्गिक वायूचा भाव दुपटीने वाढवून प्रति 'मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट' ('एमएमबीटीयु') ८.४ डॉलर करण्याची डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शिफारस अमलात आणण्याच निर्णय घेतला होता. परंतु, लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे निवडणूक आयोगाने 'युपीए' सरकारच्या या निर्णयाच्या अमंलबजावणीला मनाई केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने गेल्या २५ जून रोजी या 'रंगराजन फॉरम्युल्या'च्या अंमलबजावणीबाबतचा निर्णय तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता नव्या सरकारने नियुक्त केलेली केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांची समिती या प्रश्नासाठी नियुक्त करण्यात आलेली असून ती सर्व बाजूंचे म्हणणे समजवून घेऊन आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

साभार-नवी दिल्ली, वृत्तसंस्था

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla