Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ग्रामीण जीवन व्यवस्थापनाची प्रदीप लोखंडेंनी उलगडली युक्ती
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 17 September 2013 06:15

ग्रामीण जीवन व्यवस्थापनाची प्रदीप लोखंडेंनी उलगडली युक्ती

मुंबई: आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग आणि युक्ती मीडिया कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रूरल रिलेशन्स’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध सामाजिक उद्योजक प्रदीप लोखंडे यांनी मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आणि उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. संजय रानडे, अभ्युदय बॅंकेचे संचालक अशोक चाळके आणि युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदीप लोखंडे म्हणाले की, ‘ग्रामीण भारतात प्रचंड क्षमता असून जागतिक स्तरावर भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. परंतू भारतीय नागरिकांचे या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. या भागाला समजून घेतल्याशिवाय कोणत्याही उद्योजक अथवा विकासकाला पूर्णपणे यशस्वी होणे शक्य नाही. एकाच प्रकारचा विशिष्ट मानसिक ग्रह ही भारतीयांची सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे आपण विकसित राष्ट्र नसून विकसनशील आहोत हे भारतीय नागरिक विसरतात आणि व्यवस्थेवर टिका करतात. आपल्याकडे पादत्राणे एअर कंडीशन दालनात विकली जातात, भाज्या मात्र रस्त्यावर विकल्या जातात; अशा प्रकारची विरोधाभासी व्यवस्था आपल्याकडे बघायला मिळते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने जशी शहरांत पोहोचतात तशीच ती ग्रामीण भागातील घराघरांतही पोहोचतात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात प्रचंड फरक पडत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा ग्राहकांना घरबसल्या होत आहे. त्यामुळे येत्या २०२० सालापर्यंत नागरिकांना व्यवस्थेच्या बाबतीत चांगला-वाईटाचा फरक कळू लागेल. धर्म आणि जातव्यवस्थेचा पगडा कमी झालेला असेल आणि स्त्रियांचे खऱ्या अर्थाने सशक्तीकरण झालेले असेल.’
‘क्रिकेट असो वा आय.टी आज प्रत्येक क्षेत्रात छोट्या शहरातील वा ग्रामीण भागातील तरूण आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. प्रदीप लोखंडे यानी ४००० खेड्यांना प्रत्यक्ष भेटी दिलेल्या असल्यामुळे त्यांचे ज्ञान मुंबई विद्यापीठातील लोकांना मिळावे याकरिता युक्ती आणि मुंबई विद्यापीठातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला’, असे युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत म्हणाले.
प्रदीप लोखंडेंनी ग्रामीण भागातील लोकसंख्या, बाजारपेठा, शिक्षणप्रणाली आणि ग्राहकांच्या सवयी आदी माहितीचा खजिना त्यांच्या यावेळी उलगडला. भारतातील ४००० खेड्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा अनूभवही त्यांनी यावेळी कथन केला.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla