Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
‘जगण्याविषयी बोलू काही’ प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांचे उद्योजकांवर सोळा संस्कार
अर्थविषयक बातम्या
Tuesday, 10 September 2013 12:25

‘जगण्याविषयी बोलू काही’
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांचे उद्योजकांवर सोळा संस्कार

मुंबई - प्रत्येक उद्योजक आपापल्या उद्योजकीय व्यापात एवढा गुंतलेला असतो की त्याला स्वत:ला वेळ देण्याइतपत वेळ नसतो. जशी आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते तशीच आपल्या मनाला देखील मशागतीची गरज असते. ही गरज ध्यानात घेऊन ‘बिझनेस थॉट्स’ या संस्थेने ‘जगण्याविषयी बोलू काही’ या कार्यशाळेचे मंगळवारी सायंकाळी, दादर(पश्चिम) येथे आयोजन केले होते. या कार्यशाळेस प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बिझनेस थॉट्सचे संचालक राजेश जाधव देखील उपस्थित होते.
उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना दा. कृ. सोमण यांनी उद्योजकीय जगतातले तसेच दैनंदिन जीवनातील काही दाखले दिले. आजच्या काळातील कोणत्याही व्यक्तीस उपयुक्त ठरतील अशा सोळा संस्काराची त्यांनी माहिती दिली. या सोळा संस्कारामध्ये शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य, बुद्धीचे आरोग्य, ध्येयनिश्चिती, वेळेचे व्यवस्थापन, शिस्त, संपर्क, श्रमसंस्कार, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, सुजाण पालकत्व, आर्थिक नियोजन, वैज्ञानिक दृष्टीकोन, छंद, कर्मयोगाचे महत्व आणि प्रश्न सोडविण्याची कला आदींचा समावेश त्यांनी केलेला आहे. हे सर्व संस्कार कोणत्याही व्यावसायिकाने अथवा सर्वसामान्य माणसाने अंमलात आणले तर त्याचा कायापालट होऊ शकतो असे सूतोवाच त्यांनी केले.
“हे सोळा संस्कार जी व्यक्ती आचरणात आणेल ती नक्कीच यशस्वी होईल”, असे गौरवोदगार बॅंक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक दिलीप बेन्द्रे यांनी काढले. यावेळी दा. कृ. सोमण यांना ‘बिझनेस थॉट्स’चे संचालक राजेश जाधव यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास विख्यात हस्ताक्षर विश्लेषक शुभदा जहागिरदार, मराठी इंटरनॅशनल क्लबचे समन्वय सतीश रानडे, नेटवर्क बिझनेस फोरमचे संचालक राम कोळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla