Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
'सिंघम रिटर्न्स' चार दिवसांत शंभर कोटींवर
मनोरंजन वृत्त
Tuesday, 26 August 2014 04:12

'सिंघम रिटर्न्स' चार दिवसांत शंभर कोटींवर

नवी दिल्ली- दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांच्या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस भरपूर गल्ला जमविला आहे. त्यांच्या ‘सिंघम रिटर्न्स‘ने प्रदर्शनानंतर चार दिवसांत शंभर कोटी रुपये कमावले आहेत.

यावेळी अभिनेत्री करीना कपूर नायिकेच्या भूमिकेत आहे. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत प्रदर्शित करण्यात आलेल्या ऍक्शनपट ‘सिंघम रिटर्न्स‘ने पहिल्या दिवशी ३२ कोटी ९ लाख रुपये कमावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई करीत एकूण शंभर कोटींचा टप्पा गाठल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे.

अजय देवगण फिल्म्स, रोहित शेट्टी प्रॉडक्शन्स आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट यांनी या चित्रपटाची संयुक्त निर्मिती केली आहे. यापूर्वी शेट्टी-देवगण जोडीने बोल बच्चन, सिंघम आणि गोलमाल चित्रपट-मालिकेची निर्मिती करीत यशस्वी कमाई केली आहे.

सिंघमची कमाई
शुक्रवारी- ३२ कोटी ९ लाख
शनिवारी- २१ कोटी ५ लाख
रविवारी- २४ कोटी ५५ लाख
सोमवारी- १४ कोटी ७८ लाख
मंगळवारी- ८ कोटी २१ लाख
एकूण- १०.६८ कोटी रुपये

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla