Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
'राम लखन'चा रिमेक!
मनोरंजन वृत्त
Friday, 22 August 2014 06:10

'राम लखन'चा रिमेक!

जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या भूमिका असलेल्या 'राम लखन' (१९८९) चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. सुभाष घईंच्या या चित्रपटात डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी, अमरिश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
करण जोहरने नुकतचं ट्विट केलं असून या चित्रपटाकरिता रोहित शेट्टी, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि मुक्ता आर्टस् हे त्रिकुट एकत्र येणार आहे. करणने यापूर्वी अग्निपथचा रिमेक केला होता. 'राम लखन'मध्ये जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी साकारलेल्या भूमिकांकरिता रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची निवड करण्यात आली होती. मात्र, रणबीर कपूर त्याच्या आगामी 'रॉय', 'जग्गा जासूस' आणि 'तमाशा' या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे तो तारखा देऊ शकत नाही. त्यामुळे रणबीरऐवजी वरूण धवनला घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटातील नायकांची जरी निवड झाली असली तरी यात कोणत्या अभिनेत्री दिसतील यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्हचं आहे.
साभार - लोकसत्ता

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla