Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
संगीत नाट्याच्या "शिलेदार" हरपल्या.
मनोरंजन वृत्त
Thursday, 08 August 2013 07:31

संगीत नाट्याच्या "शिलेदार" हरपल्या.

jaymala shiledarजयेष्ठ रंगकर्मी, पद्मश्री व संगीत नाट्यक्षेत्रातील महत्वाचे व्यक्तीमत्व जयमाला शिलेदार यांचे आज पहाटे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालविली.
संगीत नाटकांचे प्रचार आणि प्रसार करणा-या जयमाला शिलेदार यांनी सलग पन्नास वर्षे संगीत नाटकप्रेमींसाठी संगीत नाटके रंगमंचावर सादर केली. मराठी नाट्यसृष्टीतील गायक व अभिनेते तसेच आपले पती जयराम शिलेदार यांच्याबरोबर अनेक संगीत नाटकात काम केले. १९४२ पासून मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, संगीत शारदा हि त्यांची गाजलेली नाटके.
१९२६ साली जन्म झालेल्या या गायकीने बेळगावमध्ये दोन वर्ष गायकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील गाण्याचे शिक्षण त्यांनी जयपूर घराण्याच्या मोगुबाईकडे घेतले. बालगंधर्व यांच्याबरोबर कलाकार म्हणून काम केलेल्या यांची ओळख असणा-या संगीत नाटिकेला ३ वेळा बालगंधर्व, २००६ मध्ये लता मंगेशकर तर हल्ली पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अशा अजरामर संगीत नाट्यातील गायकेला मुंबई-पुणे ऑनलाईन.काम तर्फे भावपूर्ण आदरांजली......

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla