Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
स्मरण नाट्यवीराचे....
मनोरंजन वृत्त
Saturday, 27 July 2013 17:28

स्मरण नाट्यवीराचे....

प्रसाद शिंदे(प्रतिनिधी), मुंबई :-
108 7921मराठी रंगभूमीतील नाट्य क्षेत्रात मानाने नाव घेतले जाते ते म्हणजे “मास्टर दत्ताराम वळवईकर” यांचे. नुकतेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “आठवणीतील मा.दत्ताराम” परिसंवाद आणि प्रदर्शन हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभाग व संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात मास्टर दत्ताराम यांनी साकारलेल्या नाटकातील भूमिकांचे चित्रे व त्यांच्यावर आधारित रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते रविंद्र नाट्यमंदिर येथे झाले. कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी, डॉ.भालेराव, मोहनदास सुखटणकर, श्रीमती फैय्याज व आशालता, अरुण घाडीगांवकर, कमलाकर गोंजी, शशी भालेकर, कृष्णा बोरकर, आशुतोष घोरपडे, मा.दत्ताराम यांचे पुत्र नाना वळवईकर इत्यादी दिग्गज उपस्थित होते.
108 7928अशा या नाट्यवीराने १०० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय करत अडीचशेहून अधिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच २०० नाटके त्यांच्या तोंड पाठ होती. त्यांनी इंद्रजितवध, कीचकवध, मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, रायगडाला जेव्हा जाग येते, सौभद्र, पंतांची सून, होनाजी बाळा इत्यादी अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. वरील कार्यक्रमात मा.दत्ताराम यांनी साकारलेल्या नाटकातील भीष्म, राम, संभाजी, मोरोपंत अशा अनेक
भूमिका संस्कार भारती कलामांचाच्या कलाकारांनी रांगोळ्यांच्या वा चित्र प्रदर्शनाच्या मार्फत सादर करण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनात मा.दत्ताराम यांचे गणेश अडवल यांनी साकारलेले शिल्प हि पाहण्यात येईल. हे प्रदर्शन रविंद्र नाट्यमंदिर येथील पु.ल.देशपांडे अकादमी येथे २८ जुलै पर्यंत सकाळी १० ते ८ वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहिलं.

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla