Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
गणपतीच्या सुट्ट्यांचा निर्णय पालकसभेत
शैक्षणिक बातम्या
Friday, 22 August 2014 05:59

गणपतीच्या सुट्ट्यांचा निर्णय पालकसभेत

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या विषय ठरलेल्या गणेशोत्सवाच्या सुट्टीबाबत निर्माण झालेल्या संम्रभाला शालेय शिक्षण विभागाने पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांची सभा घेऊन त्यामध्ये गणेशोत्सव तसेच अन्य सणांच्या सुट्टीबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी गुरुवारी एका परिपत्रकाद्वारे या निर्णयाची घोषणा केली.

राज्यातील शाळांना गणपतीची सुट्टी देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असून त्यासाठी मनविसे तसेच राष्ट्रवादीचे विजय देसाई यांनीही ही मागणी लावून धरली होती. त्यातच बुधवारी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने गणेशोत्सवानिमित्त पाच दिवसांची सुट्टी जाहीर केल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला होता. शिक्षण विभागाने याबाबत गुरुवारी परिपत्रक जाहीर करत सुट्ट्यांच्या निर्णयाचा चेंडू शाळा प्रशासनाच्या कोर्टात टोलावला.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्षातील सुट्या व कामाच्या दिवसांचे वेळापत्रक सर्व विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांना कळवावे, वेळापत्रकातील अन्य सुट्या कमी करून स्थानिक सुट्टी देण्यास शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी आणि या सुट्यांमधील बदलांबाबत वर्षाच्या प्रारंभीच पालक- शिक्षक सभा घेऊन निर्णय घेण्याची सूचना या परिपत्रकात करण्यात आली आहे.


साभार - महाराष्ट्र टाइम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla