Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
‘IIM’साठी एकच पर्याय... पुणे!
शैक्षणिक बातम्या
Friday, 22 August 2014 05:51

‘IIM’साठी एकच पर्याय... पुणे!

देशभरात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'आयआयएम'सारख्या नामवंत आणि दर्जेदार संस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी जागा, शिकविण्यासाठी उपलब्ध असणारे मनुष्यबळ, नागरी सोयीसुविधा या दृष्टीने पुणे सर्वथा योग्य आहे. त्यामुळे 'आयआयएम' पुण्यात होणेच इष्ट आहे...'

...मॅनेजमेंट शिक्षण क्षेत्रातून अशा शब्दांत पुण्याच्या 'आयआयएम'साठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रात 'आयआयएम' स्थापन करण्याविषयीची घोषणा झाली. मात्र, ते राज्यात कोठे होणार, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पुण्यात 'आयआयएम' व्हावे, अशी मागणी गेली काही वर्षे होत आहे. मात्र, ते आणण्यासाठी मोर्चेबांधणी करणे आवश्यक असल्याची बाब अधोरेखित होत आहे. 'मटा'ने पुण्यात 'आयआयएम' स्थापन करण्यासाठी मोहीम उभारून शिक्षण क्षेत्रातील मागणीला उचलून धरले आहे.

'पुण्यामध्ये असलेल्या उद्योगांना चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता नेहमीच भासणार आहे. त्या दृष्टीने 'आयआयएम' येण्याने फायदाच होणार आहे. बेंगळुरू, कोझीकोडे, इंदोर या ठिकाणी 'आयआयएम' उभारण्यात आल्याने त्या शहरांना आणि पर्यायाने तेथील उद्योगांना फायदाच झाला. पुणे हे शैक्षणिक केंद्र आहेच. त्यात आयआयएमची भर पडली, तर स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळेल,' असे मत ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ प्रा. सुभाष भावे यांनी व्यक्त केले.

'पुण्यात आयआयएम का हवे, याचे योग्य प्रकारे सादरीकरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुण्यातील उद्योगांची प्रतिनिधी संस्था असलेली मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर; तसेच इतर संस्थांचा पुढाकार खूप महत्त्वाचा ठरणार आहे; कारण आयआयएम पुण्यात आल्यास पुण्याभोवतीच्या उद्योगक्षेत्रात गुंतवणूक वाढण्यासही मदत होणार आहे,' असे सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. पराग काळकर यांनी नमूद केले. 'आयआयएम'मधील विद्यार्थ्यांना स्थानिक इंडस्ट्रीजमधील केस स्टडी अभ्यासायला मिळू शकतील. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटी वाढू शकते. नोकरीत येणाऱ्या माणसाने स्थानिक इंडस्ट्रीतील केस स्टडीचा अभ्यास केला असल्याने, त्याचा फायदा कंपनीला होईल आणि पर्यायाने प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकेल. यातूनच इंडस्ट्रीला एखादी चांगली सक्षम लीडरशिप मिळू शकते, असेही मत व्यक्त होत आहे.

साभार - महाराष्ट्र टाइम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla