लग्नसराई लेख
लग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?
लग्नसराई लेख

लग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते?

kundali-sthanप्रत्येकाला भविष्याच्या गर्भात काय दडलय हे जाणुन घेण्याची तीव्र इच्छा असते. मनुष्याला अनेक स्वप्ने, अनेक ध्येय असतात, ती पुर्ण होतातच असे नाही. आपले स्वप्न, ध्येय पुर्ण होतील का ? हे जाणुन घेण्याची इच्छा ज्योतीषशास्त्राकडे आकर्षीत करते. तसेच जीवनातील अडचणी समस्या दूर होतील का ? केव्हा ? कसे ? हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे प्रभावी माध्यम आहे. माणुस जन्माला येतो तो कोरा, पण त्याचासोबत एक अद्रुष्य गोष्ट येते ती म्हणजे प्रारब्ध. यामध्ये जे लिहीलेले असते ते भोग चुकत नाही, ते त्याला भोगावेच लागतात, मग ते सुख असो की दुःख हे आपण केवळ ज्योतिष्य शास्त्राच्या माध्यमातुन पाहू शकतो.

Read more...
 
ब्रायडल मेकअप
लग्नसराई लेख

ब्रायडल मेकअप

लग्नाचा मेकअप / ब्रायडल मेकअप
bridal makeupलग्न म्हणजे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो. ज्यांचे लग्न असते, त्या मुलासाठी आणि मुलीसाठी तो दिवस खूप वेगळा आणि खास असतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपला लुक वेगळाच असावा, असे त्यांना वाटते. विशेषतः मुली लग्नासाठी खास तयारी करतात; पण बऱ्याच मुलींना लग्नासाठी तयारी करताना काय काळजी घ्यायची, हे माहीत नसते. त्याची योग्य ती माहिती आधीच मिळवली, तर लग्नाच्या वेळी गडबड होत नाही.

Read more...
 
सप्तपदी मी रोज चालते …
लग्नसराई लेख

सप्तपदी मी रोज चालते …

saptpadiलग्न म्हणजे समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग !

Read more...
 
से चीज !!!!
लग्नसराई लेख

से चीज !!!!

chees  cameraकोण आहे असा जो लग्ना मध्ये भटजीला पण ऐकत नाही ?
कोण आहे जो लग्नात कोणत्याही विधीला pause करू शकतो?

बरोबर ओळखल -- Photographer !

एक वेळेस लग्नात नवरा-नवरी नसतील तरी चालेल पण Photographer पाहिजेच... लग्नाचे फोटो म्हणजे एक उत्सुकतेचा विषय असतो. लग्नातले प्रत्येक क्षण खास असतात. हे खास क्षण जपून ठेवावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाचे अल्बम चाळताना, सहकुटुंबासोबत लग्नाचे व्हीडिओ बघताना या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत जातात.

Read more...
 
सोने खरेदी करताना …
लग्नसराई लेख

सोने खरेदी करताना …

goldसोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.
सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.

Read more...
 
पैठणी पासून बनलेल्या चपला आता खास नववधूसाठी…
लग्नसराई लेख

पैठणी पासून बनलेल्या चपला आता खास नववधूसाठी…

paithani chappalपैठणी नेसणं हे सर्व महिलांसाठी एखाद्या आभूषणाइतकंच महत्त्वाचं असतं. याच पैठणीच्या रॉ मटेरिअलपासून अनेक वस्तू आता तयार होऊ लागल्या आहेत. पैठणीच्या पर्स, ड्रेस मटेरियल, मोबाईल पाकिट आपण पाहिलंच असेल, मात्र आता पैठणीच्या कपड्यापासून विविध डिझाईनच्या चप्पल तयार करण्यात आल्या आहेत.

येवल्यातील पैठणी ही जगभरात प्रसिद्ध असल्याने इथे खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असते. येवल्यातील पैठणी विणकरांना फारसा मोबदला मिळत नाही. त्यामुळे पैठणी विणकर कोष्टी समाजाने आपली अस्तित्त्व टिकवण्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. पैठणी विणकाम करताना, उरलेल्या कपड्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली. आधी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ड्रेस मटेरिअल आणि ड्रेस तयार केले. त्यानंतर मनी पर्स तयार करण्यात आल्या. इतकंच नाही तर बाहुला-बाहुलीसाठी ड्रेस, मोबाईल पाऊच तयार करण्यात आले.

Read more...
 
अरेबिक मेहंदी
लग्नसराई लेख

अरेबिक मेहंदी

Arebic mehandiगो-या आणि नाजूक हातावर मेंदी(मेहंदी)ची नक्षी अलगद उतरत जाते. अगदी हातभर मेंदी काढून त्यात नव-याचं नाव लिहिणं आणि लग्नात त्याला ते शोधायला लावणं हा खेळ तसा जुनाच. या मेंदीची नक्षीही फॅशनप्रमाणे बदलत गेली. काही हौशी मुली अगदी हातभर कोपरापर्यंत मेंदी काढून घेतात. पण काहींना हातभर काढून घ्यायलाही वेळ नसतो.

Read more...
 
महाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ......
लग्नसराई लेख

महाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ......

स्त्री पुरुष हे जीव शास्त्रीय दृष्ट्या दोन स्वतंत्र व्यक्ती विशेष आहेत .तथापि त्या दोहोंमध्ये निसर्गत:च विलक्षण आकर्षण असते . स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक   आकर्षणातून उत्पन्न झालेल्या विवाहाला समाजस्थैर्याचा आधारभूत अशा 'विवाह संस्थेचे' उद्दात रूप देण्याचे महत्वपूर्ण कार्य "विवाह संस्कार" करतो . विवाह हा स्थिर म्हणजे दीर्घकाळ टिकणारा कसा राहील , त्या योगे घराण्याला स्थैर्य  लाभून मागील व पुढील पिढ्यांना व पर्यायाने समाजाला स्थैर्य कसे लाभेल यासाठी धर्मशास्त्रकारांनी  अनेक विधी ,नियम आणि कायदे प्रस्थापित केले . विवाह हा स्थिर आणि सुप्रजाकारक कसा होईल ही काळजी समाज धुरीणांच्या मनीमानसी वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत सदैव लागलेली दिसते .याच काळजीतून विवाह संस्कारांची उभारणी झाली आहे.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla