Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
भेंडी बाजार, Mumbai
शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स / Shopping markets in mum

भेंडी बाजार

      मुंबईतील एक अविभाज्य भाग व प्रसिद्ध मार्केट म्हणजे भेंडी बाजार. जे.जे हॉस्पिटल वरून समोर दिसतो व जो व्हीटीपर्यंतचा भाग म्हणजे भेंडी बाजार. महमद अली रोड, भुलेश्वर, खेतवाडी, नळबाजार, चोरबाजार, पायधुनी, डोंगरी, कुंभारवाडा या मधील जो भाग म्हणजे भेंडी बाजार. बाजाराच्या आवारात बोरी मुसलमानाची संख्या जास्त असून त्यांच्या प्रसिद्ध चुनाभट्टी व मिनारा मशीद याच आवरत पाहायला मिळतील. मुळात या भागाला भेंडी बाजार हे नाव पडलं याची काहीच माहिती नाही. महमदअली रोड वरून आत गेलात कि बाजारात मोठ घड्याळाच मार्केट लागते. यात देशी-विदेशी, मनगटी, भिंतीवरच्या असे सर्व प्रकारची घड्याळे येथे मिळतात. थोडं पुढे घरगुती वापरात येणारे रंगीबेरंगी गालिचे, कार्पेट, गाद्या उपलब्ध असतात. पुढे अजून फेरफटका मारत गेल्यास पटकन नजरेस पडतात ती मेहंदी आणि अत्तर विकणा-यांची दुकाने. इतकचं नाही तर आपल्या समोर मेहंदीचे कोनही बनवून मिळतात. देशी-विदेशी चॉकलेट त्याचबरोबर किराणामाला पासून तसेच चप्पल, कपड्यापर्यंत ते बुद्धिबळ, टेनिस याचे लाकडी व प्लास्टिक सामानही मिळते. फिरून कंटाळा आला कि पेटपुजेचीही सोय येथे आहे. त्या दुकानापैकी प्रसिद्ध दुकान म्हणजे सिकंदरी होटेल. विशेष म्हणजे कबाब साठी प्रसिद्ध असलेले हे दुकान त्याचबरोबर येथे मोघलाई पद्धतीचे पदार्थही सहज उपलब्ध होतील. त्याचबरोबर दुसरं प्रसिद्ध होटेल म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोघांचीही सोय असलेले शालीमार होटेल. अशा या दोन्ही हॉटेलला येथे आल्यावर नक्कीच भेट द्या. या बाजारात जाण्यासाठी तुम्ही एक तर हार्बर रेल्वेच्या किवा वेस्टर्न रेल्वेच्या ग्रांट रोड स्थानकावरून अगदी सहज जाऊ शकता.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla