Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
गांधी मार्केट, Mumbai
शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स / Shopping markets in mum

गांधी मार्केट

   मुंबईतील प्रसिद्ध मार्केटपैकी हे एक मार्केट. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईत आलेल्या पंजाबी आणि सिंधी यांच्या उदरनिर्वाहासाठी हे मार्केट उभारण्यात आले. तेव्हा मार्केटमध्ये शिरलात कि पंजाबी आणि सिंधी व्यापारी या मार्केट मध्ये दिसतीलच. हार्बर लाईनवरील किंग सर्कल स्थानकावर उतरल्यावर लगेचच हे मार्केट सुरु होते. थोड पुढे गेला कि महात्मा गांधी मंडई नावाचा बोर्ड दिसतो. मार्केटमध्ये जवळपास १५० दुकाने आहेत. सहज मार्केटमध्ये फेरफटका मारल्यास लगेच लक्षात येईल कि, येथे मुलींच्या आवडीच्या गोष्टी मिळतात. भारागरी साड्यापासून ते कॉटन, सिंथेटीकपर्यंतचे सर्व प्रकारचे ड्रेस मटेरीयल मिळतात. तसेच बांगड्या, दागिने, चपला या महिलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतात. पूर्वी येथे हे फक्त कपड्यांचे मार्केट होते पण आता येथे भाजीपाला, लेदरच्या वस्तू, दागिने मिळतात. रात्रीच्या काळोखात बाजरातील वस्तू डोळे दिपवून टाकतात. असे महिला केंद्रित आलेल्या मार्केटला नकीच भेट द्या. 

-प्रसाद शिंदे 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla