Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
काळा घोडा फेस्टिव्हल
Art galleries and Theaters in Mumbai

काळा घोडा फेस्टिव्हल 

मुंबईतील प्रसिद्ध फेस्टिव्हल म्हणजे काळा घोडा फेस्टिव्हल. ९ दिवस चालणारा हा सोहळा जानेवारीच्या शेवटीपासून सुरु होऊन तो फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालतो. १९८८ मध्ये वृंदा मिलर, शरयू दोषी, कांगा, माणिक दावर आदींनी मिळून कला घोडा असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनद्वारे हा फेस्टीव्हल केला जातो. पूर्वी हा महोत्सव एमटीडीसी करायची. उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर वीक्षित करणे आणि कलागुणांचे प्रदर्शन भरवण्याच्या उद्देशाने हा फेस्टीव्हल सुरु झाला. हि असोसिएशन हिरीटेज बिल्डिंग जपण्याचे काम करत असून पडीक इमारतींना उजाळा देण्याचे मुख्य काम करते. या फेस्टीव्हलमधून जमा होणाऱ्या पैशातून हि असोसिएशन वर्षभर काम करते. काळा घोडा या फेस्टिवल दरम्यान शनिवार-रविवार ओपन डेक बसमार्फत हिरीटेज ट्रीपहि घडवली जाते. यावेळी या इमारतींचा इतिहास सांगितला जातो. हा फेस्टीव्हल जहांगीर आर्ट गॅलरी, ऱ्हिदम हाऊस अशा इमारतींच्या प्रांगणात सुरु असतो. अशा या मुंबईकरांचा खास आकर्षण ठरलेल्या फेस्टिव्हल मध्ये बच्चेकंपनी, तरुण, आणि जेष्ठ नागरिकांना खिळवून ठेवणा-या सर्व गोष्टी असतात. तरुणांच्या कला-गुणांना वाव देणारा हा फेस्टिव्हल असतो. खरेदी, खान डान्स, फिल्म्स, थीएटर, म्युझिक, अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल या कार्यक्रमात दिसून येते.

-प्रसाद शिंदे 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla