Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
कान्हेरी लेणी / Kanheri Caves in National Park Mumbai (संजयगांधीराष्ट्रीयउद्यान, बोरीवली)
मुंबईतील लेणी व किल्ले / Caves and Forts in Mumbai

कान्हेरी लेणी (संजयगांधीराष्ट्रीयउद्यान, बोरीवली)

अजिंठा,वेरुळसारख्या जगप्रसिध्द लेण्यामुंबईत बघायच्या असतील तर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट ही द्यायलाच हवी.

पहिल्या शतकात बौध्द साधूंनी कोरलेल्या कान्हेरीच्या लेण्या फारच मोहक आहेत. येथील शिल्प आणि त्यावरील कलाकुसर ही वाखाणण्या जोगी आहे.

विदेशी पर्यटकांची येथे येण्याकडे विशेष रूची आहे. भारतातील ऐतिहासीक वास्तूपैकी ही एक वास्तू आहे. अतिशय शांत, स्वच्छ आणि सुंदर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटिपासून १५०० फूट उंचीवर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून येथे जाण्यासाठी बस व भाड्याच्या सायकल्सची देखील सोय उपलब्ध आहे.

आपल्या अशा विविध आकर्षणांमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

या उद्यानास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे स्थानक जवळचे आहे. तेथुन उद्यानाकडे जाण्यासाठी बस व रिक्षा सहज उपलब्ध आहेत.

एखादा रविवार किंवा सुट्टिचा दिवस कुटूंबीयांसमवेत घालवायचा असेल तर हे उद्यान अतिशय योग्य निवड ठरेल.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla