Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
डेविड ससून लायब्ररी / David Sasoon Library
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

डेव्हिड ससून लायब्ररी 

     डेव्हिड ससून ग्रंथालय हे मुंबई शहरातील मोठे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे काला घोडा या ठिकाणाजवळ रॅम्पार्ट रो येथे एल्फिन्स्टन कॉलेज, वॉटसन्स होटेल आणि आरमारी तसेच सैन्यदलाच्या  मोठ्या इमारतीच्या जवळ आहे. १८४७ साली रॉयल मिंट व व गव्हर्न्मेंट डॉक यार्ड येथील कर्मचार्‍यांनी ज्ञानार्जनासाठी वाचनालय असावे म्हणून पुढाकार घेऊन खटपट केली. त्यातून ससून मेकॅनिक इन्स्टिट्यूट या संस्थेचा जन्म झाला. विविध विषयांत मुंबईकरांनी प्रावीण्य मिळवून उत्कर्ष साधावा हा संस्थेचा हेतू होता. त्यासाठी गलय, जाणकारांची भाषणे वगैरे सोयी करण्यात आल्या. हे ग्रंथालय अल्बर्ट ससून यांनी आपले वडील डेव्हिड ससून यांच्या नावाने हे ग्रंथालय बांधले. या ग्रंथालयाच्या इमारतीची उभारणी स्थानिक मालाड यलो स्टोन या प्रकारच्या दगडांनी करण्यात आली. दि. २४ मार्च, १८७० रोजी हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले करण्यात आले. याच्या उभारणीस १,२५,००० रुपये खर्च आला, यापैकी ६०,००० अल्बर्ट ससूनने केला तर उरलेला करच बॉम्बे प्रेसिडेनसी सरकारने केला.

-प्रसाद शिंदे 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla