Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
खडा पारसी /Khada Parsi
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

खडा पारसी

मुंबई शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या अनेक वास्तू  आहेत त्यांपैकी एक प्रमुख व प्रसिद्ध वास्तू म्हणजे खडा पारसी. पारशी पेहरावातील उंच स्तंभवर उभारलेला हा पुतळा भायखलयाचे प्रतिक बनले आहे. पारशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शेट करसेटजी माणोकजी यांच्या स्मरणार्थ बेलासिस रोड, क्लेअर रोड, डंकन रोड आणि रिपन रोड या जंक्शनवर १८७५ मध्ये त्यांच्या मुलांनी खडा पारसी पुतळा उभारला. १०० वर्षापेक्षा अधिक जुने असलेला करसेटजी माणोकजी यांच्या पुतळा बीड व ब्राँझ धातूपासून तयार केलेला आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी असलेला चौथरा नक्षीकाम करून आकर्षक करण्यात आलेला आहे. सध्या हे स्मारक महानगर पालिकेच्या सुपूर्द केलेले आहे. हे स्मारक भायखळा उड्डाणपुला जवळ दिमाखात उभे  आहे. हा करसेटजी माणोकजी यांचा पुतळा व त्यावरील नक्षीकाम पाहण्याजोगे आहे. तर नक्कीच या स्मारकास भेट द्या.

 

 

 

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla