Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
क्रॉफर्ड मार्केट / Crawford Market
शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स / Shopping markets in mum

क्रॉफर्ड मार्केट(महात्मा फुले मंडई) 

मुंबईतील सर्वात मोठे मार्केट म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांचे  नाव या मंडईस ठेवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर  काळात या मार्केटचे नाव महात्मा फुले मंडई करण्यात आले. सन १८३५ ते १८६९ मध्ये बांधण्यात  आलेल्या या मंडईस त्यावेळी २० लाख रुपये खर्च आला असून मंडईच्या उभारणीसाठी कुर्ला खाणीतील तसेच गुजरातमधील पोरबंदर येथील टिकाऊ दगडांचा वापर करण्यात आला. ही मंडई त्याच्या वरील उंच घड्याळ ,टॉवर व घुमटाने शोभून दिसते. येथे फळांपासून ते माशांपर्यंत  तसेच दैनंदिन वापरात येणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू या एक एकाच आवारात मिळण्याची सोय आहे. या मार्केटमध्ये आपल्याला विविध फळे , सुकामेवा यांच्या बरोबर कवठ, रामफळ व केळ्यांचे कितीतरी प्रकार पाहायला मिळतील.त्याचबरोबर विविध देशी-परदेशी फुलांचे प्रकार मन मोहून टाकतात. या मार्केटमध्ये जाण्यासाठी सी.एस.टी स्थानकावरून पायी जाऊ शकता.

 

 

 

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla