Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
कोलाबा कोझवे मार्केट /Colaba Causeway Market
शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स / Shopping markets in mum

कुलाबा कॉजवे मार्केट

मुंबईतील अजून एक प्रसिद्ध मार्केट म्हणजे कुलाबा कॉजवे मार्केट. रिगल थीएटरवरून सरळ खाली जाणारा अर्थात शहीद भगत सिंग मार्ग म्हणजेच कुलाबा कॉजवे मार्केट. रस्त्याच्या दुतर्फा मार्केट असून, एका बाजूला मोठ-मोठाले शोरूम व दुसऱ्या बाजूला स्टॉल्स असे या मार्केटचे स्वरूप आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ असलेले हे हाय प्रोफाइल मार्केट काहीसाठी स्टेटस सिंबॉलही असून ट्रेंडी आउटफिटपासून युवावर्गाच्या गरजेच्या सर्व वस्तू येथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर घर सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूबरोबरच जीन्स, सिल्क जीन्सचे कुर्ते, कुर्ते, शूज, बांगडया इत्यादी वस्तूंची येथे खरेदी करायला मिळते. विशेषतः या मार्केट मध्ये तर्हेतर्हेची  घड्याळे, जुन्या काळातील घड्याळे, त्याचबरोबर येथे मिळणारी स्टोन ज्वेलरी, मंकी ज्वेलरी हि येथील शॉपिंगची   खासियतच आहे. तर घराला वेगळे लुक देणारे सामानही इथे आहे. याशिवाय लहानग्यांचे  कपडे आणि सॉफ्ट  टॉइजच  भले मोठे दुकानं आहेत. मार्केटमध्ये खरेदी करून वा फेरफटका मारून थकलो तर येथे पेटपूजेची सोयही येथे आहे. येथे लिओपोड केफे, डॉमिनोझ शिवाय मधेच भेलपुरी पानीपुरीचे दुकानही आहेत.

Colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
colaba causeway...
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla