Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ताज महाल हॉटेल / Taj Mahal Hotel
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

ताज महल हॉटेल

ताज महल हॉटेल हे मुंबई च्या कोलाबा भागातील गेट वे ओफ इंडिया समोरील एक अत्यंत मोहक आणि सुंदर पंचतारांकित होटेल आहे . तसेच आपल्या ऐतिहासिक महत्व आणि विशिष्ठ बांधकामामुळे मुंबईतील निवडक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे . हे हॉटेल प्रसिद्ध औद्योगिक समूह टाटा ग्रुप च्या मालिकेचे आहे , जवळजवळ १०९ वर्ष जून्या ह्या हॉटेल ने जगभरातल्या अनेक दिग्गजाची सेवा केली आहे. जसे बिल क्लिंट्न , प्रिन्स ऑफ वेल्स , हिलरी क्लिंट्न , बराक ओबामा, इत्यादींचा त्यात समावेश आहे. ह्या इमारतीत एकूण ५६५ खोल्या आहेत. हे हॉटेल १६ डिसेंबर १९०३ साली सुरु करण्यात आले . पहिल्या महायुद्धाच्या वेळी ह्या इमारतीचा होस्पिट्ल म्हणून वापर करण्यात आला होता. असं म्हणतात की जमशेदजी टाटा यांना एका होटेल मध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हे होटेल बनवण्याचा निर्णय घेतला. ह्या वास्तू विषयीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेट वे ओफ इंडिया समोरून जो भाग दिसतो तो ह्या हॉटेल चा मागील भाग आहे, तर मुख्य प्रवेश द्वार याच्या विरुद्ध दिशेला आहे. आता त्याच्याच बाजूला ताज महल टोवर्स म्हणून दुसरी इमारत उभारण्यात आली आहे. 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla