Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
फ्लोरा फौंटन / हुतात्मा चौक/ Flora Fountain / Fort
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

फ्लोरा फाउन्टन

वीर नरीमन रोड आणि डी.एन. रोड यांच्या नाक्यावर उभ असलेल फ्लोरा फाउन्टन हे सुमारे २५ फुट उंचीच शिल्प. त्याच्या चारही बाजूला युरोपीय पुराणकथांमधल्या बायकांच्या मूर्ती आणि त्याच्या टोकावर फ्लोरा या रोमन देवीची पूर्णाकृती आहे. फ्लोरा ही फुलांची देवता , तिच्या पूजनाने धन , एश्वर्य व आनंद प्राप्त होतो अशी समजूत होती. या शिल्पातून पूर्वी अखंड कारंजी थुई थुई उडत असत. याच्या चौथऱ्याच्या बाजूला पायऱ्या होत्या. तिथे संध्याकाळी गोरे साहेब आपल्या माडमांना घेऊन बसायचे. शनिवारी रात्री हा परिसर माणसांनी फुलून जायचा.
आज फ्लोरा फाउन्टनच्या विस्तीर्ण प्रांगणाला हजारो धावत्या गाड्यांचा विळखा असतो. मधूनच जाणाऱ्या पायरस्त्यावरून चाकरमाने धावत असतात आणि एका बाजूला नायलॉन साड्यांपासून स्वस्तातली बॉलपेन आणि जडीबुटी विकणाऱ्यापर्यंत अनेक फेरीवाल्यांचा गराडा असतो. 
एकूणच फ्लोरा फाउन्टनही आता अस्सल मुंबईकर झाल आहे ! 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla