Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
जनरल पोस्ट ओफिस / जी.पी.ओ. / G.P.O./ General Post Office
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

जी. पी. ओ. - जनरल पोस्ट ऑफिस 

बोरीबंदर लगड असलेली अशीच एक वास्तू जिची भव्यता आणि वास्तुकला तितकीच वाखाणण्याजोगी आहे ती म्हणजे जी.पी.ओ.! मुंबईतून टपालाने जाणारी अगणित पत्रे , पार्सले आणि वर्तमान पत्रे इत्यादींची वर्गवारी झाल्यानंतर ती इच्छित स्थळी पाठवण्याकरिता बोरीबंदर स्टेशनवर पाठवली जातात. हवाई डक सेवा सुरु होण्या आधीच्या काळात परदेशी पत्र व्यवहाराचा सर्व कारभार ह्याच पोस्ट ऑफिस मधून होत होता. ह्या इमारतीची वास्तू शिल्पकला इंडो अरब पद्धतीवर आधारली आहे . स्थानिक भागात मिळणारे दगड ह्या इमारतीसाठी वापरले आहेत. पिवळ्या रंगाचा दगड हा कुर्ला येथून तर पांढरे दगड गुजरात येथील ध्रांगद्रा परिसरातून आणले आहेत. ह्याचा भव्य घुमट व ऐसपैस सज्जे यांनी या इमारतीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. ह्या इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहाची उंची थेट इमारतीच्या माथ्यावरील घुमटाच्या टोकापर्यंत आहे.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla