Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुंबई विद्यापीठ / Mumbai University
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

मुंबई विद्यापीठ आणि राजाबाई टॉवर

मुंबई विद्यापीठ हे NAAC द्वारे पंचतारांकित श्रेणी प्राप्त एक प्रसिद्ध विद्यापीठ आहे. १८५७ साली स्थापना करण्यात आलेले हे विद्यापीठ भारतातील पहिल्या तीन विद्यपिठांपैकी म्हणजेच कलकत्ता विद्यापीठ मद्रास विद्यापीठ यांपैकी एक आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यंचा यात समावेश होतो. मुंबई विद्यापीठाद्वारे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. पुर्वी एल्फिस्ट्न महाविद्यालयाची वास्तू मुंबई विद्यापीठाचे मुख्यालय म्हणून वापरात होती. विद्यापीठाला दोन कॅंपस असून एक २३० एकरचे तर दुसरे १३ एकरचे आहे. मुंबई विद्यापीठाचे सद्याचे कॅंपस कलिना ,सांताक्रूझ येथे आहे  तर दुसरे फ़ोर्ट येथे आहे. 

शैक्षणिक उपक्रमांसाठी दरवर्षी २० प्राध्यापक विद्यापीठा तर्फे विदेषात जातात. कलिना कॅंपस मध्ये मध्ये जवाहरलाल नेहरू लायब्ररी , ज्योतीराव फुले भवन , गरवारे इंस्तित्युत , मोदी संग्रहलय , १०० पेक्षा जास्त प्रकारची गुलाबाची फुले असलेले 'रोझ गार्डन', मराठी भाषा भवन इत्यादी वास्तुंचा वास्तुंचा समावेश होतो.

फ़ोर्ट ययेथील वास्तू चे बांधकाम गोथिक शैलीचे आहे. येथिल पदवीदान सभागृह हे हेरिटेज वास्तू म्हणून संबोधित केले गेले आहे.  फ़ोर्ट येथिल कॅंपस मध्येच मुंबईतील प्रसिद्ध वास्तू ''राजाबाई टॉवर" उभे आहे. 

लंडन च्या  बिग बेन च्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या ह्या टॉवर चे नाव मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक प्रेमचंद रायचंद यांच्या  आई च्या स्मरणार्थ देण्यात आले आहे. हे ४ मजली स्मारक २८० फुट उंच आहे. स्मारकावरील घड्याळात १६ वेगवेगळ्या प्रकारच्या ट्युन्स आहेत.

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla