Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
ओवल मैदान / आझाद मैदान / Oval Maidan / Aazad Maidan
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

आझाद मैदान आणि ओव्हल मैदान

आझाद मैदान हे मुंबईतील खेलंसाठिचे मैदान (sports ground) असून त्याचा आकार त्रिकोणी आहे.  पुर्वी ते बॉम्बे जिमखाना मैदान या नावाने ओळखले जात असे. या मैदानावर आंतरशालेय क्रिकेट चे सामने नेहमी होत असतात. तसेच अनेक राजकीय सभा, सम्मेलने इत्यादी येथे आयोजित होत असतात. येथील क्रिकेट च्या खेळपट्टीसाठी हे मैदानं प्रसिद्ध आहे. येथे एकूण २२ क्रिकेट च्या खेळपट्ट्या आहेत. याच मैदानावर १९८७ साली सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांनी हरीस शिल्ड च्या सामन्यात ६६४ धावांची भागिदरि केली होती . याच्या दक्षिणेला १८७५ साली बांधलेले बॉम्बे जिमखाना क्लब हाउस आहे. या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे १९३१ साली महात्मा गांधिंनि आतापर्यंत ची सर्वात मोठी राजकीय सभा याच मैदानावर घेतली होती. 

दक्षिण मुंबईत वसलेले ओव्हल मैदान हे एक प्रसिद्ध असे ठिकाण असून चर्चगेट स्थानकाच्या दक्षिणेस हे मैदान  आहे . या मैदानच्या आकारावरून याचे नाव ओव्हल मैदान असे पडले. २२ एकर जागेत पसरलेले  हे मैदान मुख्यत्वे करून फुटबॉल आणि क्रिकेट या खेळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनेक राजकीय प्रचार सभा , सम्मेलने इत्यादी कार्यक्रम देखील येथे होतच असतात. 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla