Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
तारापोरवाला मत्स्यालय / Taraporewala Aquarium
मुंबईतील संग्रहालये / Museums and Learning Space wildlife

तारापोरवाला मत्स्यालय

मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी आठ लाख रु खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता. असे हे दुमजली मत्स्यालय १०८ फुट लांब व ९४ फुट रुंद असून याच्या उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला. मत्स्यालयात प्रवेश केल्यानंतर समुद्रातील व तलावातील वेगवेगळ्या प्रकारचे मासे नजरेस पडतात. या मत्स्यालयात १०० हून अधिक मासे असून आजही येथे ७२ प्रजातीचे मासे व गोड्या पाण्यातील १०० प्रजाती आहेत. यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच 'स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. त्याचबरोबर माशांच्या टँकवर लिहिलेले नाव आणि त्याबद्दलची दोन ओळीतील माहितीही मत्स्यालयात फेरफटका मारताना सर्वात महत्वाची गोष्ट वाटते. अशा या इमारतीत तळमजल्यावर मत्स्यालय आणि दुसऱ्या मजला मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्यालयाकरिता आहे. अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किवा टक्सीने जाऊ शकता.

वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत

     रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.

प्रवेश शुल्क:- लहानासाठी(६ ते १६ वर्षाच्या आत)- १० रुपये
            प्रौढांसाठी:- १५ रुपये.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla