Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
भुलेश्वर मार्केट / Bhuleshwar Market
शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स / Shopping markets in mum

भुलेश्वर मार्केट

          खरेदीसाठी परिचयाचा परिसर, तरीही तीन-चार फे-यापर्यंत हमखास गोंधळावणारा, हवी ती वस्तू हमखास मिळणारा आणि त्या वस्तू शोधताना गिर्हाइकाना भुलवून टाकणारा तसेच कोरीव कलाकुसरीने सजलेल्या जैन मंदिर व इतर मंदिराची गल्ली असणारा, असा दक्षिण मुंबईतील भुलवणारा परिसर म्हणजे भुलेश्वर. गिरगाव, काळबादेवी, सी.पी.टंक कुठूनही येथे शिरकाव करायला सुरुवात केली तरीही या ठिकाणी पोहचता येते. येथून आपण चालत गेलो कि आपण एका गल्लीच्या टोकाशी आलो अस वाटत तोच समोर एक-दोन गल्ल्या फुटलेला चौक येतो, अशा वेळी आपल्याला नेमके कुठे जायचे हेच समजत नाही. अशा या भूलेश्वरच्या गल्लीमय बोळयातून फिरताना वेळ कसा निघून जातो हे कळतच सुद्धा नाही.

         ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या भूलेश्वरच्या गल्लीमय मार्केटमध्ये विविध रंगाच्या मोत्यांच्या-खड्यांच्या लेस, दागिने, कपडे, पुजासाहित्य, देवादिकांच्या मुर्त्या, भांडी इ. तसेच, कपडे-पायपुसण्यापासून ते साबणापर्यंतचे  सामान येथे मिळत असून या वस्तू घेणाऱ्यांची झुंबड कायम बघायला मिळते. शॉपिंग करून थकल्यावर आठवण करून देणाऱ्या पोटपूजेची सोयही असून भेलपुरी, पाणीपुरी, सरबत विकणारे यांची भेट हमखास होते. परंतु, या नेहमीच्या खाऊपेक्षा लक्ष वेधून घेणारा वेगळा पदार्थ म्हणजे मसाला पापड..भाजलेल्या पापडावर टाकलेली तिखट चटणी, कांदा, टोमटो, कोथंबीरिची चव काही वेगळीच...असे हे पापड विकणारे अनेक पापडवाले येथेच दिसतात.. अशा या तिखट पापडाची चव घेत-घेत आपण पांजरपोळ, जय अंबे चौक, मुंबादेवीपर्यंत येऊन पोहचतो. पांजरपोळ म्हणजे एक बोळाच. या वर पहिलं कि ‘श्री मुंबई पांजरपोळ’ अशी पाटी दिसून येते. या पांजरपोळमध्ये साड्या-ड्रेसमटेरियलची त्यापेक्षाही पुजासाहीत्यांची, देवादिकांच्या मूर्ती आणि फोटोंची भरपूर दुकानं आहेत. पुढे चालत गेले कि मंदिराच्या गल्ली पुढे भुलेश्वर मंडई असून येथे फळफळावळ आणि भाज्या मिळतात. तसेच या मंडईत विशेषतः फुलांची वेगळी मंदी आहे. अशा या भुलवणाऱ्या मार्केटला नक्कीच भेट द्या..

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla