Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
खोताची वाडी / khotachi Wadi
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

खोताची वाडी 

पोर्तुगीज राजाने इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला आपली मुलगी देताना हुंडा म्हणून मुंबई त्याला दिली. खोताची वाडी ही पोर्तुगीज शैलीत बनवलेल्या चर्च व बंगल्यांसाठी प्रसिध्द आहे. पोर्तुगीजांनी मुंबईतील पहिले शहरी स्वरुपात खोताची वाडी ही 1780 साली वसवलेली आहे आणि अजून ही ती तशीच आहेत. खोताच्या वाडीच्या आसपासचा भाग त्यात समाविष्ट करण्यात आला. खोताच्या वाडीतील बहुतेक घरे ही ख्रिच्शन व मुंबईतील मूळ रहिवासी म्हणजेच कोळ्यांची घरे आहेत. ती अगदी जुन्या पद्धतीने बांधलेली लाकडी घरं आहे. काहीशी पोर्तुगीज बनावटीची, काहीशी गोव्यातल्या छोट्या-छोट्या घरांसारखी इथली घरे आहेत. काही घरांच्या अंगणात तुळशी वृंदावन, तर काहींच्या अंगणात "होली क्रॉस'.
एका घराच्या गच्चीतून खोताची वाडी संपूर्ण पहाता येते. सगळीकडेची घरं अशी एकमेकांना चिकटून बांधलेली दिसतात. अगदी एका घरातून दुसरं घर कधी कुठे सुरू होतं हे कळतंच नाही. एकही घर पाडून पुन्हा बांधलं गेलं नाही किंवा आधुनिकीकरण त्या वाडीत केलं नाही. अजूनही इथले रहिवासी त्यांची घरं, वाडी संस्कृती, सभ्यता टिकवून ठेवायचा प्रयत्न करत आहेत. खोताच्या वाडीच्या प्रवेश करताना गोव्यामध्येच फिरतो आहोत असे वाटते. ख्रिसमस व गणपती उत्सवादरम्यान खोताची वाडी फिरण्याचा योग्य वेळ आहे. त्या वेळी खोताच्या वाडीतील घरे व गल्ल्या सजवल्या जातात. काही वर्षांपूर्वी ही वाडी पाडून मॉल वगैरे बांधण्यात येणार होता. पण इथल्या लोकांनी कोर्टात जाऊन लढून, केस जिंकली आणि ही वाडी जपली. तेव्हापासून या परिसराला "प्रॉपर्टी ऑफ हेरिटेज' घोषीत करण्यात आलंय.  आपल्या पिढीला आणि पुढे येणाऱ्या पिढीला परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या संस्कृतीच्या इतिहासाचं प्रतिक म्हणून अशा काही गोष्टी बघायला मिळणे गरजेचे आहे.
गिरगांव (मुंबई), चर्नी रोड स्टेशनजवळ....

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla