Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
फिरोजशहा मेहता उद्यान / हँगिंग गार्डन /Phirojshah Mehata Gardan / Hanging Garden
मुंबईतील बागा आणि उद्याने /Gardens ,Lakes , Forests

हँगिंग गार्डन्स

         मुंबईच्या दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९ व्या शतकाच्या उतरार्धात मलबार हिलच्या उंच टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. तब्बल ३० दशलक्ष गॅलन पाणी मावेल इतकी मोठी टाकी उघडीच होती. त्यामधील पाणी गढूळ होण्याची शक्यता होती म्हणून या टाकीवर बगीचा करण्याच ठरले आणि १२५ वर्षाचा वारसा असलेल्या या गार्डन्सची स्थापना १८८० साली करण्यात आली. १९२१ साली बागेची डागडुजी करून त्याला मुंबईचे पहिले राजपुत्र फिरोजशहा मेहता यांचे नाव देण्यात आले. या गार्डन्सचं मुख्य आकर्षण म्हणजे येथील वृक्षराई.. त्यामुळे भर दुपारीसुद्धा उन्हाची झळ न लागता निवांत शांत बसता येते. त्याचबरोबर या उद्यानाच्या आवारात हिरवेगार झाडांना गाय, जिराफ, हत्ती इत्यादी प्राण्याचा आकार देण्यात आला आहे. याच गार्डन्सच्या समोरच असलेलं पार्क म्हणजे कमला नेहरू पार्क. या पार्कमधील प्रमुख आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. २० फुट उंच असलेल्या या बुटातून साऱ्या मुंबईचे दर्शन घडते. त्याचबरोबर या पार्कातून पूर्ण चौपाटी, मरीन ड्राईव्ह व संपूर्ण मुंबईचे नयनरम्य दर्शन घडते. या गार्डनला भेट देण्यासाठी आपण चर्नीरोड स्थानकावरून जाऊ शकता. या स्थानकावरून या पार्कात आपण टॅक्सी ने १५ ते २० मिनिटात पोहचू शकतो.

वेळ:- सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

 

Hanging Gardens
hanging gardens
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
hanging gardens...
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla