Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
प्रियदर्शनी पार्क / Priyadarshani Park
मुंबईतील बागा आणि उद्याने /Gardens ,Lakes , Forests

प्रियदर्शनी पार्क

         मुंबईतील नेपिअन सी रोड लगत असणाऱ्या उंच उंच इमारती, समुद्रकिनारा व नारळाच्या झाडांच्या रांगेत असलेला विस्तीर्ण हिरवागार भूप्रदेश म्हणजे प्रियदर्शनी पार्क आणि स्पोर्ट्स कॉम्पलेक्स. २० एकर परिसरात वसलेले हे पार्क पीडीपी या नावाने ओळखले जाते. या पार्कमध्येच अ‍ॅथलेटिक ग्राउंड असून यामध्ये चार टेनिस कोर्ट, फुटबॉल, कराटे खेळायला जागा आहे. त्याचबरोबर जवळपास जोगर्स पार्क व जॉगिंग ट्रॅक, तसच झाडाझुडपांच्या मध्यभागी असलेले गवताचे लहान मोठे उंचवटे व त्या उंचवट्यावर बसल्यावर समोर दिसणारा खळखळणारा समुद्र आणि त्यातील मोठमोठाले दगड हि या पार्कची शानच म्हणावी लागेल. या पार्कातील मऊ-मऊ गवतावर बसून समुद्रात होणारा सूर्यास्त पाहण्यात संध्याकाळ कसी निघून जाते हे कळतच नाही. सावली देणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांची वाटिका असून येथे विसावा घेण्यासाठी बाकांची सोय केली आहे. सतत धावपळीच्या युगात घटकाभर विश्रांतीच सुख देणारी मोकळी हवा, अथांग सागर, उंचच उंच झाडे हे सारे या पार्कात पाहायला मिळेल. मुंबईतील या हिरव्यागार पार्कला नक्कीच भेट द्या. या पार्कला भेट देण्यासाठी ग्रांट रोड स्थानक जवळ पडेल किवा आपण दादर येथील बस स्थानकावरून जाऊ शकता.

बस क्र. ३७, ६०, ६३

वेळ:- सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४.३० ते १० 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla