Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
हाजी अली दर्गा / Haji Ali Dargah
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

हाजी अली

सिनेतारकापासून ते सर्वसामान्यपर्यंत सर्वांनाच भक्तीभावाने नतमस्तक करायला लावणारे हे ठिकाण म्हणजे मुंबईतील हाजी अली दर्गा...१४३१ साली बांधण्यात आलेली १०० वर्ष जुनी असलेली हि दर्गा हाजी अली या सुफी संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हि वास्तू बांधण्यात  आली आहे. दुरून हि दर्गा पाहिल्यास अथांग सागरात एक मोती तरंगण्याचा आभास होतो. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विरुद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर हि दर्गा आहे. या दर्ग्यात जाण्याचा अनुभव काही निराळाच.. या दर्ग्यापर्यंत जाण्यासठी एक पायवाट आहे हि पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा देसेनाशी होते आणि जणू हि दर्गा समुद्रावर अधांतरी तरंगल्या सारखी भासते. दर्ग्यात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशा भारतीय आणि अरेबिक वास्तूशैलीचा संगम आढळतो. दर्ग्यातील कबरीभोवती चारही   बाजूंनी  चांदीची चौकट असून सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांचा आधार आहे. या नक्षीकामात अरेबिक भाषेत लिहिलेली अल्लाची ९९ नावे आहे. या दर्ग्यासमोर महालक्ष्मी देवीचे मंदिरही आहे. थोडे पुढे गेलात कि घोड्याच्या शर्यतीचे मैदान म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स पाहता येतील. या दर्ग्याचे व येथील ठिकाणे पाहून झाल्यावर हाजी अलीला जो मुख्य सिग्नल आहे तिथे उभे असलेले प्रशस्त हाजी अली ज्यूस सेंटर. थंडगार मिल्कशेक, सरबत, फालुदा या वेगवेगळ्या व्हरायटीबरोबर येथे आंबा, चिकू, सफरचंद अशा विविध फळांपासून बनवलेले क्रीम ही येथील खासियत. तर नक्कीच देवदर्शन झाल्यावर या ज्यूस सेंटरला  भेट द्या. या दर्ग्याला भेट द्यायला  तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी व मुंबई सेंट्रल स्थानकावरून तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकावरून जाऊ शकता किवा तुम्ही बसने हि प्रवास करू शकता.

बस क्र:- ३३, ३७, ६३, ८१, ८२, ८४, ९२, ९३, १२४, १२५, ३५१, ३५७, ३८५, ५२१.

 

Haji Ali Dargah...
haji ali 1
haji ali 2
haji ali 3
haji ali 4
haji ali 5
haji ali 6
haji ali 7
haji ali 8
haji ali 9
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla