Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बाबुलनाथ मंदिर / Babulnath Temple
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

बाबुलनाथ मंदिर

मुंबईतील अनेक शिवमंदिरांपैकी एक म्हणजे बाबुलनाथ मंदिर. मलबार हिल टेकडीवर वसलेले हे मंदिर खालून पहिले कि चटकन दिसत नाही. मंदिर अतिशय सुंदर व प्रत्येक खांब नक्षीकामाने भरलेला दिसून येतो. असे हे संगमरवरी मंदिर भोलेनाथाचे मंदिर नागर स्थापत्यशैलीचा नमुना समजले जाते. मुख्यतः हे मंदिर १७८० मध्ये बांधले आहे. त्याचा विस्तार १८४० मध्ये झाला असून मंदिराला सध्याचे भव्य रूप हे १९०० साली मिळाले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर बाबुलनाथाचे शिवलिंग दिसते. या शिवलिंगावर सतत दही-दुधाचा अभिषेक सुरु असून हे तीर्थ गोमुखातून बाहेर पडते. हे तीर्थ घेण्यास अनेक भाविकांची झुंबड उडते. ह्या मंदिरात श्रावणी सोमवारी व महाशिवरात्री दिवशी शेकडो भाविकांची रांग लागते. मंदिरात जाण्यासाठी ग्रॅंट रोड किवा चर्नीरोड या कोणत्याही रेल्वेस्थानकाहून पोहचता येते.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla